Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८४९३ गावांपैकी ८४८८ गावांची खरीप पिकाची हंगामी पैसेवारी महसूल प्रशासनाच्यावतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तब्बल ३२८९ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत तर ५१९९ गावांची पैसेवारी ५० पैसा पेक्षा जास्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या निर्णयानुसार मराठवाडा विभागासाठी खरीप पिकाची हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी तर सुधारित ३१ ऑक्टोबरला तर अंतिम १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश आहेत.
त्यानुसार ही हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त हंगामी पैसेवारी अहवालावरून विभागाची हंगामी पैसेवारी नेमकी किती हे स्पष्ट झाले आहे.
५० पैशाच्या आत खरीप पिकांची हंगामी पैसेवारी आलेल्या मराठवाड्यातील गावाच्या संख्येवरून यंदा उत्पादन आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट असल्याचे स्पष्ट होते आहे. बुडीत क्षेत्र, महापालिका हद्दीत येणारी व बेचिराख गावे यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही
४ लाख ०४ हजार २९८ हेक्टर क्षेत्र पडीक
खरीप पैसेवारी अहवालानुसार मराठवाड्यातील ७६ तालुक्यातील ८४९३ गावांमध्ये लागवडीखालील क्षेत्र ५६ लाख ९ हजार १६७ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ५१ लाख ६७ हजार १८६ हेक्टरवर पेरणी आहे. तर तब्बल ४ लाख ४ हजार २९८ हेक्टर क्षेत्र पडीक असल्याची माहिती पुढे आली आहे.
पैसेवारी ५० पैशाच्या आत असलेली गावे
तालुकानिहाय ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेल्या गावांच्या संख्येमध्ये पैठणमधील १४, बीड १७, गेवराई १६७, अंबाजोगाई १०६, परळी १०८, परभणी १२८, गंगाखेड १०५, पूर्णा ९४, पालम ८०, पाथरी ५६, सोनपेठ ५२, मानवत ५४, सेलू ९५, जिंतूर १६९, अर्धापूर ६४, कंधार १२६, लोहा १२६, भोकर ७९, हादगाव १३७, हिमायतनगर ६४, किनवट १९१, बिलोली ९२, धर्माबाद २३, उमरी ६३, मंठा ११७, अंबड १३८, घनसावंगी ११८, हिंगोली १५२, सेनगाव १३३, कळमनुरी १४८, वसमत १५१, औंढा नागनाथ १२२ गावांचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
तहसील गावांची संख्या पैसेवारी
अप्पर तहसील
छ. संभाजीनगर ४० ५५
छ. संभाजीनगर १५४ ५४.३३
पैठण १९१ ५३.३३
फुलंब्री ९१ ५६
वैजापूर १६४ ५५.४०
गंगापूर २२२ ५१.१३
खुलताबाद ७६ ५२
सिल्लोड १३२ ५२
कन्नड २०१ ५४
सोयगाव ८४ ५२
धाराशिव १२६ ५५
तुळजापूर ११५ ५६
उमरगा ९६ ५३
लोहारा ४७ ६२
भूम ९३ ५७
परांडा ९१ ५८
कळंब ९७ ५४
वाशी ५४ ५६
बीड २३९ ५३.८८
आष्टी १७७ ५४.३०
पाटोदा १०७ ५४.१५
वडवणी ४९ ५६.७०
शिरूर कासार ९५ ५४.१५
गेवराई १९२ ४९.३६
अंबाजोगाई १०६ ४८
केज १३५ ५३.५८
माजलगाव १२१ ५२.८६
धारूर ७३ ५४.०५
परळी १०८ ४८
परभणी १२८ ४६
गंगाखेड १०५ ४८.२५
पूर्णा ९४ ४८.०६
पालम ८० ४८
पाथरी ५६ ४७
सोनपेठ ५२ ४५.४४
मानवत ५४ ४७.५६
सेलू ९५ ४८
जिंतूर १६९ ४७.६०
नांदेड ८७ ५२
अर्धापूर ६४ ४८
कंधार १२६ ४८
लोहा १२६ ४७
भोकर ७९ ४९
मुदखेड ५४ ५१
हादगाव १३७ ४९
हिमायतनगर ६४ ४८
किनवट १९१ ४८
माहूर ८४ ५२.२५
देगलूर १०८ ५२
मुखेड १३५ ५२
बिलोली ९२ ४४.५०
नायगाव ८९ ५२
धर्माबाद ५६ ४९
उमरी ६३ ४९
जालना १५१ ५४.४०
बदनापूर ९२ ५५
भोकरदन १५७ ६०.५०
जाफराबाद १०१ ६३.७१
परतुर ९७ ५१.२५
मंठा ११७ ४७.१०
अंबड १०८ ४९.२८
घनसावंगी ११८ ४८.३५
लातूर १२४ ५६
औसा १३३ ५२
रेनापुर ७६ ५३
उदगीर ९९ ५२
जळकोट ४७ ५४
अहमदपूर १२४ ५४
चाकूर ८५ ५८
निलंगा १६२ ५४
देवणी ५४ ५८
शिरूर अनंतपाळ ४८ ५४
हिंगोली १५२ ४९.१३
सेनगाव १३३ ४८.४५
कळमनुरी १४८ ४९.४१
वसमत १५१ ४८
औंढा नागनाथ १२२ ४८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.