Sand Extraction Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Mafia : वाळूमाफियांविरोधात जळगावात ‘महसूल’ची कारवाई

Revenue Department : गेल्या पंधरा दिवसांपासून वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. वाळू वाहनांच्या पाठीमागे वाळूमाफियांचे वाहन भरधाव वेगाने कुठल्याही अधिकाऱ्यांची भीती न बाळगता बिनधास्तपणे सुसाट धावत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गेल्या पंधरा दिवसांपासून वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. वाळू वाहनांच्या पाठीमागे वाळूमाफियांचे वाहन भरधाव वेगाने कुठल्याही अधिकाऱ्यांची भीती न बाळगता बिनधास्तपणे सुसाट धावत आहे. अशातच पथकाने वाळूची तीन वाहने जप्त केली आहेत.

याबाबत ३० व ३१ ऑक्टोबरला महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल पथकांनी वाहन (एमएच १९, झेड ३६३६) पिवळ्या रंगाचे डंपर जळगावकडून मुक्ताईनगरकडे जात असताना भुसावळ येथील वांजोळा रोड रेल्वे ब्रिजजवळ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध कामी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल यांचे सयुक्तिक पथक गस्तीवर असताना वाहन तपासणी घेतले असता वाहन चालकाकडे ईटीपी गुजरात राज्याची पावती होती.

परंतु दोन्ही पावत्यांमध्ये तफावत आढळून आल्याने हे वाहन व्हेइकल ट्रेकिंग करण्याकामी तहसील आवारात नेत असताना पीकअप गाडी ही त्याच दिशेने भुसावळकडे येत असताना त्या वाहनाची तपासणी केली. त्यात देखील अवैध वाळू आढळून आली.

या वाहनाचा क्रमांक एमएच २०, ईएल ०२७१ असा होता. महसूल पथकाला पाहताच वाहन थांबवून वाहनचालक जागेवरून पसार झाला. गस्तीवर असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे वाहन तहसील कार्यालयात जमा केले असून, दोन्ही वाहनांचा पंचनामा केलेला आहे.

तसेच ३१ ऑक्टोबरला जळगावकडून भुसावळकडे येणारे डंपर (एमएच १५, बीजी ५२१४) दीपक कौतिक तायडे (रा. निमखेडी) यांच्या मालकीचे अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना जप्त केल्याने या वाहनाचा व वाहनातील गौण खनिजाचा पंचनामा केलेला असून, वाहन तहसील कार्यालयात दंडात्मक कार्यवाही करता जमा केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT