Boat Tender Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Boat Tender Issue: यांत्रिक बोटी खरेदीस तांत्रिक कारणाने विलंब

Flood Relief Delay: जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांसाठी यांत्रिक बोटी खरेदी करण्यास जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी ३५ लाख रुपयांचा निधी चार महिन्यांपूर्वी वर्ग करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangali News: जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांसाठी यांत्रिक बोटी खरेदी करण्यास जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी ३५ लाख रुपयांचा निधी चार महिन्यांपूर्वी वर्ग करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बोटींची खरेदी करताना तांत्रिक बाबी पडताळल्या जात आहेत.

निविदेसाठी लागू केलेल्या अटी व शर्तीनुसार खरेदी करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांनी दिले.जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील पूरग्रस्त गावांना यांत्रिकी बोटी दिल्या जाणार आहेत. बोटी खरेदीसाठी पहिल्या निविदेवेळी अटी व शर्तीबाबत आक्षेप आल्यामुळे ती रद्द करण्यात आली.

तर दुसऱ्यावेळी निविदा पूर्व बैठक घेतली गेली. मात्र एकच निविदा धारक आल्याने प्रथम मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर तांत्रिक पडताळणी केली असता, सर्वच निविदाधारक अपात्र झाले. आता तिसऱ्यांदा पुनर्निविदा २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यांत्रिक फायबर रेस्क्यू बोटींचा वापर हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बोटी खरेदी करताना बारीकसारीक बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत.

लोकप्रतिनिधींनीही पारदर्शी व सर्व ठोकताळे तपासून कोणत्याही दबावासमोर न झुकता विहित शासन निर्णय तसेच निविदेसाठी लागू केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच खरेदी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार निविदा प्रकिया राबविताना निविदाधारकांना पुरेशी संधी देणे व निकोप स्पर्धा होणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT