Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Sugarcane Farming : स विशेषतज्ज्ञ शांतीकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन आणि माती परीक्षणाबाबत, चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या कृषी कार्याबाबत, तर कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी अभियानाच्या उद्दिष्टांवर सादरीकरण केले.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कृषी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ या अभियानास प्रारंभप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, विशेष कार्य अधिकारी शरद मगर, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर आदींच्या उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ झाला.

तसेच सर्व तालुक्यांमधून हजारो शेतकरी ऑनलाइन पद्धतीने या अभियानात सहभागी झाले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

Sugarcane Farming
AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्राने ऊस उत्पादनावाढ शक्य

ऊस विशेषतज्ज्ञ शांतीकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन आणि माती परीक्षणाबाबत, चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या कृषी कार्याबाबत, तर कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी अभियानाच्या उद्दिष्टांवर सादरीकरण केले.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : साखर उताऱ्यासाठी खत, पाणी व्यवस्थापनाचे नियोजन

सुदर्शन वाळवेकर यांनी कीटकनाशक फवारणीची काळजी, तर विजय बुनगे यांनी नॅनो खतांचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक सारिका वसगावकर यांनी केले, तर आभार तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केले.

राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील पीकस्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजना आणि ‘कृषी’चे लाभार्थी, तालुका सल्लागार समिती व आत्मा सदस्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आली. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत वारसदारांना अर्थसाह्य वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com