Fiber Boat Production : लाकडाच्या टंचाईमुळे फायबर नौकानिर्मिती व्यवसायाला उसळी

Wood Shortage : होड्या बनवण्यासाठी मजबूत लाकडांचा तुटवडा भासू लागल्‍याने फायबर बोटींचा पर्याय मच्छीमारांकडून स्‍वीकारला जात आहे.
Fiber Boat
Fiber BoatAgrowon
Published on
Updated on

Raigad News : होड्या बनवण्यासाठी मजबूत लाकडांचा तुटवडा भासू लागल्‍याने फायबर बोटींचा पर्याय मच्छीमारांकडून स्‍वीकारला जात आहे. सरकारने फायबर बोटीवरील नियम शिथिल केल्याने लाकडांच्या तुटवड्याने मंदीच्या छायेत गेलेल्या नौकानिर्मिती व्यवसायाने पुन्हा उसळी घेतली आहे.

रायगड जिल्ह्यात आजघडीला १७ लहान-मोठे कारखाने असून, वर्षाला ७० ते ८० मध्यम आकाराच्या मासेमारी नौका तयार केल्या जातात. वर्षानुवर्षे लाकडी बोटींच्या आधारे मासेमारी करणारे मच्छीमार आता वजनाने हलक्‍या फायबरच्या बोटींकडे वळले आहेत. त्याचबरोबर मारेसारीचा फेरा लवकर पूर्ण करता यावा, यासाठी वेग वाढवण्यावरही भर दिला जात आहे.

Fiber Boat
Fisheries Department : पारंपरिक मच्छीमारांवरील नोटिसा मागे घेणार

लाकडी बोटींपेक्षा तुलनेने स्वस्त, टिकावू अशा बोटी वरसोली, अलिबाग, आक्षी-साखर, आगरदांडा, जीवना बंदरात मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागल्या आहेत. नौकानिर्मितीचा पिढीजात व्यवसाय करणारे संजय सुतार यांच्या माहितीनुसार, १९६० नंतर जंगलातून कच्चा माल उपलब्‍ध होण्याचे प्रमाण कमी झाले आणि निर्मिती व्यवसायाला उतरती कळा लागली.

Fiber Boat
Fishery Business : मत्स्य व्यावसायिकांसाठी डिजिटल नोंदणी कार्यशाळा

मच्छीमारांची पसंती

मासेमारी व्यवसायाला उतरती कळा लागली असताना बोट दुरुस्‍तीवर वारंवार होणारा खर्च मच्छीमारांना परवडत नाही. कर्जाचे हप्ते, डिझेलचा परतावा देताना नाकीनऊ येतात. मासेमारी करून आल्यावर बोट सुकवावी लागते, तिला वर्षातून एकदा चंद्रसू नावाचे द्रावण चोपावे लागते. रंगरंगोटी, रंधा मारणे, डागडुजीसाठी येणारा खर्च दीड ते दोन लाख रुपये असतो.

त्‍या तुलनेत फायबर बोटी कमी खर्चात बांधून होतात. त्यांचा देखभाल-दुरुस्‍तीचा खर्चही कमी असतो. त्यामुळे त्या बांधण्याकडे मच्छीमारांची पसंती मिळत असल्‍याचे थळ मच्छीमार सोसायटीचे संचालक शेषनाथ कोळी सांगतात.

मच्छीमारांचा विश्वास वाढला

उधाणाच्या वेळी समुद्राची दिशा आणि पाण्याचा कल केव्हाही बदलतो. अपघात झाल्‍यास लाकडी बोटींचा विमा मिळवण्यासाठी, तसेच बोट दुरुस्तीसाठी जास्‍त खर्च करावा लागतो. या फायबरच्या बोटी बनवणारे क्लाइड हेनरिक सांगतात, आधी प्रायोगिक तत्त्वावर फायबर बोट तयार केली होती, मात्र ती समुद्रात घेऊन गेल्यावर कोळ्यांचाही आत्मविश्वास आला. या मोठ्या बोटी बांधण्यासाठी नवी मुंबई, हैदराबाद येथून कच्चा माल आणण्यात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com