Assembly Session Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

Monsoon Assembly Session: संत्रा बागांवर फायटोप्थोरा या रोगामुळे बागा उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली.

Team Agrowon

Mumbai News: संत्रा बागांवर फायटोप्थोरा या रोगामुळे बागा उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली. मात्र या रोगामुळे पाच टक्क्यांवर नुकसान झालेले नाही. तसेच जास्त प्रमाणात नुकसान झाले तर प्रचलित पद्धतीने मदत देऊ, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरादरम्यान शुक्रवारी (ता. ४) दिले.

मनोज कायंदे, चेतन तुपे, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्यातील संत्रा पट्ट्यात फायटोप्थोरा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर चेतन तुपे, नाना पटोले, सुलभा खोडके, रोहित पवार यांनी चर्चा करत शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली.

चेतन तुपे यांनी या रोगामुळे चाळीस टक्के बागा बळी पडत आहेत, असा मुद्दा उपस्थित केला. तर अमरावतीच्या सुलभा खोडके यांनी बागांची वस्तुस्थिती सांगत वरूड, मोर्शी, चांदूरबाजार येथे संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षांतून एकदा चांगले उत्पादन येते. त्यामुळे शेतकऱ्याला बाग जपून ठेवावी लागते.

फायटोप्थोरा या रोगाची लक्षणे विचित्र आहे. परिणामी बागा उद्ध्वस्त होत आहेत. तरीही कृषी विभाग नुकसान झाले नाही असे सांगतो. त्यामुळे समिती नेमून पाहणी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी. राज्यमंत्री जैस्वाल यांनी सर्वच सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नुकसान झाले तर मदत देऊ, असे आश्वासन दिले.

टँकरने पाण्यासाठी योजना आणा : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी बागांना टँकरद्वारे पाणी दिले आहे त्यांच्यासाठी योजना आणावी, अशी मागणी केली. तसेच फायटोप्थोरा हा रोग पाच टक्के नव्हे तर ५० टक्क्यांवर गेला आहे. यंदा मे महिन्यातच पाऊस झाल्याने झाडांना ताण दिलेला नाही. परिणामी उत्पादकतेत घट होणार आहे. या नुकसानीची मदतही दिली पाहिजे, अशी मागणी केली. नाना पटोले यांनीही या रोगासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली. सुमीत वानखेडे यांनीही मृग बहराच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT