Electricity Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : सांगली, कोल्हापुरात १ हजार २०० रोहित्रांची दुरुस्ती

अनधिकृत वीज भार आटोक्यात आणण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. सर्व शेतीपंप ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून दिली जात आहेत.

Team Agrowon

Sangli Electricity News : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या अडीच महिन्यांत नादुरुस्त झालेली एक हजार २०२ रोहित्रे शेतीपंपाच्या सुरळीत वीज पुरवठ्यासाठी (Electricity Supply) महावितरणकडून दुरुस्त करून बसविण्यात आली आहेत.

सद्यःस्थितीत महावितरणकडे पुरेशा प्रमाणात रोहित्र व ऑईलचा साठा उपलब्ध आहे. महावितरणकडून नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ३७२ व सांगली जिल्ह्यातील ८३० रोहित्रे बदलण्यात आली आहेत. वाढीव वीज भार वा इतर तांत्रिक बिघाडामुळे रोहित्रे नादुरुस्त होतात. रोहित्रांवरील अनधिकृत वीज भार हटविण्यासाठी वीजचोरीविरुद्ध तीव्र मोहीम राबविण्यात येत आहे.

अनधिकृत वीज भार आटोक्यात आणण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. सर्व शेतीपंप ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून दिली जात आहेत.

तरी आपल्या भागातील रोहित्रे नादुरुस्त झाल्यास तत्काळ महावितरणच्या नजीकच्या शाखा किंवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाबन महावितरणने केले आहे.

वीज देयके चुकीची असल्यास त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येत आहे. तेव्हा घरगुती, वाणिज्य, कृषीसह सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांनी नियमित व वेळेत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Homemade Cake Processing: केक, चॉकलेट निर्मितीतून तयार झाली ओळख

Weekly Weather: राज्यात हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT