Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage News : सतत पावसाच्या नुकसानीबद्दल उर्वरित ८४.१० कोटींची मागणी

Crop Damage In Rain : गतवर्षी (२०२२) च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांतील सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

Team Agrowon

Parbhani News : गतवर्षी (२०२२) च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांतील सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

त्याबद्दल मदतीसाठी प्रतिहेक्टरी ८५०० रुपये दरानुसार १५४ कोटी ४८ लाख ८ हजार रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु मंगळवारच्या (ता. २०) शासन निर्णयाद्वारे १ लाख ८८ हजार ५१३ शेतकऱ्यांच्या ८२ हजार ७९२ हेक्टर पीक नुकसानीसाठी ७० कोटी ३७ लाख ३२ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.

त्यामुळे उर्वरित २ लाख २ हजार २४५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ९८ हजार ९५० हेक्टरसाठी ८४ कोटी १० लाख ७६ हजार रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे महसूल व वन विभागाच्या अवर सचिवांकडे करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या (२०२२) पावसाळ्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यातील सततच्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ तालुक्यांतील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील (२ हेक्टर मर्यादेत) जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

त्यात सोयाबीन १ लाख १५ हजार २१० हेक्टर, कापूस ६२ हजार ६९४ हेक्टर, उडीद ७०.८४ हेक्टर, ज्वारी ६४७ हेक्टर, मूग ७०.८४ हेक्टर, तूर २ हजार ९०१ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये दराने २४७ कोटी १६ लाख ९२ हजार २८८ रुपये निधीची मागणी ता. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी शासनाकडे केली होती.

परंतु तब्बल सात महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर मंगळवारी (ता. २०) काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रतिहेक्टरी ८५०० रुपये दराने १ लाख ८८ हजार ५१३ शेतकऱ्यांच्या ८२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांसाठी ७० कोटी ३७ लाख ३२ लाख निधी प्राप्त झाला आहे.

सप्टेंबर ऑक्टोबर (२०२२) मधील सततच्या पावसाने नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका- बाधित शेतकरी संख्या- पीक नुकसान क्षेत्र

परभणी - ३६१४३ - २८८३४

जिंतूर- ८३८७४- ३९११६

सेलू - ४५६२० - १९४२०

मानवत - ३८३२३- १६९२४

पाथरी २८१५१- १२६५३

सोनपेठ - ३१२३० - १६१००

गंगाखेड - ५१४१९ - १४९००

पालम - ५०५५६- २१५८५

पूर्णा - २५४४२ - १२२३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT