Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy : सौर कृषी वाहिनीतून भरवशाचा वीजपुरवठा

Solar Electricity : सहा जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष असून त्यासाठी एकूण ५ हजार १७१ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

Team Agrowon

Nagpur Solar News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे कृषिपंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा मिळणार असल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासकीय व खासगी जमीन प्राधान्याने उपलब्ध होईल या दृष्टीने जिल्हास्तरावर कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी शुक्रवारी (ता.१६) दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा प्रधान सचिव श्रीमती शुक्ला यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी तसेच नागपूर विभागाचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विभागातील या सहा जिल्ह्यांत एकूण २७७ कृषिप्रवण वीज उपकेंद्रे आहेत.

या सहा जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष असून त्यासाठी एकूण ५ हजार १७१ एकर जमिनीची आवश्यकता आहे. विभागात आतापर्यंत २९९ वीज उपकेंद्र परिसरात ३ हजार ५४१ एकर जागा उपलब्ध झाली असून उपकेंद्राच्या परिसरात खासगी तसेच शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश शुक्ला यांनी दिल्या.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी वाहिन्यांचे प्रत्येक जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिन्या या सौरऊर्जेवर आणण्याचे धोरण असल्यामुळे जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध होईल या दृष्टीने वीज उपकेंद्राच्या परिसरात जागेची उपलब्धता करताना समूह पद्धतीने जागा उपलब्ध होत असेल तर प्राधान्य देण्यात यावे, असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

Cold Wave: लातुरात वाढला थंडीचा कडाका; तापमान ११ अंशावर

Farmers Crisis: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

PMFME Scheme: ‘पीएमएफएमई’ योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पुढे या

Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल; महाडीबीटीवरून थेट मदत मिळणार

SCROLL FOR NEXT