Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Water Crisis : सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तो पुरेसा नसल्याने पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : जिरेगाव (ता.दौंड) येथील तलाव विहिरी व बोअरवेल कोरडे परिसरातील वाड्यावस्त्यांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तो पुरेसा नसल्याने पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. त्यामुळे जनाई उपसा सिंचन योजनेतून जिरेगाव तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिरेगाव तलाव कोरडा पडला असून विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने तीव्र पाणीटंचाई जाणू लागले आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे तशी पाण्याची गरजही अधिक भासत आहे. ग्रामस्थांच्या मागण्यावरून नुसार शासनाने सध्या पाण्यासाठी टँकर सुरू केला आहे.

मात्र, लोकांची पाण्याची मागणी अधिक असल्याने टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी होत आहे. शासनाने टँकरने कितीही पाणीपुरवठा केला तरी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळू शकणार नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागणार आहे.

त्यामुळे जिरेगाव येथील तलावात जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास ग्रामस्थ व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जनाई उपसा सिंचन योजना राबविलेल्या वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावात सध्या खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

हे पाणी सुरू असतानाच जनाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून दौंडच्या दुष्काळी पट्ट्यातील गावांमधील तलावात पाणी सोडल्यास पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल. वरवंड तलावात पुरेसा पाणीसाठा होताच जनाई योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात

Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली

Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्‍नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू

Gorakshak Attacks: हल्ले बंद न झाल्यास पोलिस स्थानकांत छावण्या उभारू: आमदार सदाभाऊ खोत

Ganpati Festival 2025: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग

SCROLL FOR NEXT