Pune Dam Water Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Dam Discharge : पुणे जिल्ह्यातील १४ धरणांतून पाण्याचा विसर्ग

Pune Rain : जिल्ह्यात काही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १४ धरणांत ८० टक्क्यांहून अधिक साठा झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात काही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १४ धरणांत ८० टक्क्यांहून अधिक साठा झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पावसाचे जवळपास दोन महिने झाले आहे. या काळात मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला आहे. एक जूनपासून ते ३० जुलै या कालावधीत मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक ४ हजार ७२ मिलिमीटर पाऊस पडला.

तर, लोणावळा घाटमाथ्यावर ३ हजार ३० मिलिमीटर, वळवण २ हजार ६४२, कुंडली दोन हजार १६६, शिरोटा दोन हजार १११, ठोकरवाडी एक हजार ८६२, मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, लोणावळा या धरणांत जवळपास २९.६२ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी मुळशी धरणांतून सांडव्याला सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांत आत्तापर्यंत एकूण ३२.४० टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असून सर्वच धरणांत ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे.

खडकवासला धरणांतून डाव्या, उजव्या कालव्याला आणि सांडव्याला २२ हजार २१३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून उजनीतील पाणीसाठा २३.८४ टीएमसीपर्यंत म्हणजेच ४४ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे.

काही धरणे भरत आल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नाझरे आणि शेटफळ धरणक्षेत्रांत अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा अजूनही कमीच आहे.

सध्या पवना धरणांतून १४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीला सोडण्यात आला आहे. तर कासारसाईतून ८१२ क्युसेकने आरळा नदीला, चासकमानमधून ८५० क्युसेकने भीमा नदीला, वडिवळे धरणांतून ११२४ क्युसेकने इंद्रायणी नदीला, गुंजवणीतून ६७६ क्युसेक, तर वीर धरणांतून १६ हजार ९१२ क्युसनेकने कानंदी- नीरा नदीला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
कुकडी खोऱ्यातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी येडगाव, चिल्हेवाडी या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर वडज धरणांत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे येडगावमधून डाव्या कालव्याला १४०० क्युसेक, वडजमधून डाव्या कालव्याला २८० क्युसेक, तर चिल्हेवाडीतून ६३९ क्युसेकने सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मीना, कुकडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग बंद

खडकवासला धरणांच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग सकाळी आठवाजता १३ हजार ९८१ क्युसेक एवढा करण्यात आला होता. त्यानंतर साडेआठ वाजता तो बंद करण्यात आला होता. परंतु पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग, कमी-जास्त करण्याची शक्यता आहे, असे मुठा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT