Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export Registration : प्रतिकूल परिस्थितीतही निर्यातीसाठी द्राक्ष बागांची नोंदणी

Grape Farming : यंदा अति पाऊस, परतीचा पाऊस याचा फटका राज्यातील द्राक्षाला बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : यंदा अति पाऊस, परतीचा पाऊस याचा फटका राज्यातील द्राक्षाला बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे आले असून, राज्यात आजअखेर १ हजार ४८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात गत वर्षी पाण्याची टंचाई आणि गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना बसला होता. दरम्यान, द्राक्ष निर्यात सुरू असतानाच सुएज कालवामार्गे वाहतूक बंद असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटावर मात करत दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेऊन द्राक्षाची निर्यात केली. द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दर वर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करते. त्यानुसार शेतकरी द्राक्ष निर्यातसाठी नोंदणीसाठी पुढे येत असतो.

यंदाच्या हंगामात राज्यात अतिवृष्टी झाली. यामुळे द्राक्षफळ छाटणीचे वेळापत्रक कोलमडले. वास्तविक पाहता निर्यातक्षम द्राक्षाची फळ छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. मात्र फळ छाटणीच्यावेळीच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने फळ छाटणीला अडथळे आल्याने शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली. परिणामी, पंधरा ते वीस दिवस फळ छाटणी लांबणीवर पडली. गेल्या पंधरा दिवसांपासून द्राक्ष बागेला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या निर्यातक्षम द्राक्ष बागेत फळ छाटणीला गती आली आहे.

यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरू होऊन महिना होत आला आहे. नैसर्गिक संकटामुळे फळ छाटणी लांबल्याने नोंदणीही उशिरा सुरू झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले. सध्या द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणीसाठी पुढे आले आहेत. आजअखेर १ हजार ४८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. द्राक्ष निर्यात नोंदणीसाठी डिसेंबरअखेर मुदत आहे. गत वर्षी निर्यातीसाठी ४३ हजार १४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदाही द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेतच होण्याचा अंदाज आहे.

जिल्हानिहाय द्राक्ष निर्यातीसाठी केलेली नोंदणी

जिल्हा नूतनीकरण नवीन एकूण

सांगली ६९५ २ ६९७

नाशिक ३८७ ३९ ४२६

धाराशिव १८७ ०० १८७

सोलापूर १५३ ०० १५३

अहिल्यानगर २४ ०० २४

एकूण १४४६ ४१ १४८७

यंदा पावसाचा फटका निर्यातक्षम द्राक्ष फळ छाटणीला बसला असल्याने छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे नोंदणीही उशिरा सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामातील नोंदणीचे चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होईल.
प्रकाश नागरगोजे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यात १९६ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद

Latur Assembly Election : मतदानाचा आधीच उल्हास, तिथे मोबाइलचा त्रास

Satara Assembly Election : सातारा जिल्ह्यात आठ मतदार संघांसाठी मतदान

SCROLL FOR NEXT