Bacchu Kadu Approached to Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Problem of Orange Area : संत्रा पट्ट्यातील समस्यांबाबत बच्चू कडूंचे शरद पवारांना साकडे

Bacchu Kadu Approached to Sharad Pawar : संत्रा बागायतदारांना दिलासा देण्याकरिता संशोधनाची दिशा निश्चिती होणे आवश्‍यक असून, त्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी आमदार बच्चू कडू यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

Team Agrowon

Amravati News : संशोधनाअभावी संत्रा पट्ट्यात नैराश्‍य निर्माण झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संत्रा बागायतदारांना दिलासा देण्याकरिता संशोधनाची दिशा निश्चिती होणे आवश्‍यक असून, त्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी आपण पुढाकार घ्यावा,

अशी आग्रही मागणी प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

श्री. पवार हे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असून गुरुवारी (ता. २८) त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा (ता. चांदूरबाजार) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी उभय नेत्यांमध्ये राज्यातील शेती प्रश्‍नांवर चर्चा झाली.

संत्रा-मोसंबी पिकांतील संशोधनाकरिता नागपुरात केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आहे. मात्र या संस्थेला अनेक वर्षांत बागायतदारांना अपेक्षित तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले नाही. परिणामी बांगलादेश वगळता इतर कोणत्याच देशात संत्रा निर्यात होत नाही.

संत्रा, कांदा निर्यात बंदी या मुद्यांवर सविस्तर चर्चेसाठी लवकरच एक बैठक घेऊ, असे आश्‍वासन शरद पवार यांनी दिले आहे. चर्चेत राजकीय विषय कोणतेच नव्हते, असे कडू म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT