CM Eknath Shinde agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत कपात तर यंत्रमाग धारकांसाठी वीज सवलत, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Kolhapur Flood : 'कोल्हापुरात महापुराचा त्रास टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३२०० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

CM Eknath Shinde Kolhapur : साध्या यंत्रमागासाठी एक रुपये व अश्वशक्तीवरील ॲटोलूमसाठी ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलतीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत २०० पट वाढ केली आहे. त्याला येथूनच मी स्थगिती देत आहे. तसेच इचलकरंजीतील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून १०० कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोचीजवळ राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांर्तगत झालेल्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आदी व्यासपीठावर होते.

यावेळी शिंदे म्हणाले, 'केंद्र आणि राज्य शासन मिळून 'डबल इंजिन'चे काम करीत आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडविणारे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आहे. त्यासाठी बचत गटांचे खेळते भांडवल १५ हजार ते ३० हजार असे दुप्पट केले आहे. अंगणवाडी सेविकांनाही मानधन वाढीसह त्यांना मोबाईल दिला जाणार आहे. आशा सेविकांनाही निराश करणार नाही. आज महाशिवरात्रीच्या दिवशी महिलाशक्तीचे विराट दर्शन होत आहे."

ते म्हणाले, 'कोल्हापुरात महापुराचा त्रास टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३२०० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुराच्या त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ७५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. पंचगंगा नदीत येणारे दूषित पाणी रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी एसटीपी बांधण्यात येणार आहेत.

कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मी अॅडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो आहे. मुख्य न्यायाधीशांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न निकालात काढला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, 'अनेक नद्यांचे महापूर पाहिले. पण, महिलांचा महापूर या ठिकाणी पहिल्यांदाच पाहत आहे. महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून अभियान सुरू करण्यात आले असून, - त्याचा हेतू महिलांना सक्षम करणे हा आहे. आज सर्वच क्षेत्रांत महिला कार्यरत आहेत. तर आमचे सरकार तुमच्या पाठीशी आहे.'

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात आलेल्या महापुराचा आढावा घेताना उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता - टीका केली. कोल्हापुरात महापुराच्या - काळात माणुसकी पाहावसाय मिळाली होती. प्रत्येकजण एकमेकांना मदत करीत होते. हे चित्र एकीकडे होते, तर दुसरीकडे २६ जुलैच्या महापुरात आपल्या वडिलांना महापुरात सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारे कोठे, अशी टीकाही केली.

सवलतीमुळे एसटी फायद्यात

महिलांना ५० टक्के सवलत देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्यामुळे एसटी तोट्यातून फायद्यात आली. काही भागात ही सवलत लागू नसल्याचे सांगण्यात आली. तेथेही सवलत लागू केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

सुळकूड योजनेवर भाष्य टाळले इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी

योजनेचा प्रश्न संवेदनशील झाला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे इचलकरंजीकरांना दिलासा देणारे भाष्य करण्याची शक्यता होती. मात्र, त्याबाबत त्यांच्यासह पालकमंत्री मुश्रीफ यांनीही कोणतीच टिप्पणी केली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT