Dam Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Stock : धरणांतील विसर्गात घट

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे. सोमवार (ता.२२) ते शनिवार (ता. २७) या पाच दिवसांत राज्यातील धरणांत तब्बल १९०.९६ टीएमसी पाणीसाठा दाखल झाला आहे. कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. उजनीतही पाणीसाठा २५ टक्केवर गेला आहे, तर मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा साडेचार टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणक्षेत्रात १७२ मिलिमीटर, तर दावडी १४२, ताम्हिणी १४०, शिरगाव येथे १३१ मिलिमीटर पाऊस झाला. इतर घाटमाथ्यांवर हलका ते मध्यम पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. तर आंबा मंडलात सर्वाधिक १२५ मिलिमीटर पाऊस झाला. पुण्यातील वेल्हा मंडलात १०१, तर साताऱ्यातील लामज येथे १०० मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे अजूनही ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परंतु धरणांत आवक काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे विसर्गात बऱ्यापैकी घट केली आहे. सध्या कन्हेर, तारळी, कोयना, वारमा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर पुण्यातील खडकवासला, पवना, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, मुळशी या धरणांतून विसर्ग सुरू आहे. नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. खानदेशातही अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत.

कोकणातही पावसाचा प्रभाव कमी झाली आहे. सध्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रत्नागिरीतील आंगवली मंडलात ८३, कोंडगाव ६६, देवळे ७५, देवरुख ६०, तुळसानी ६१, सिंधुदूर्गमधील कणकवली, फोंडा, सांगवे मंडलात ७८, तर भेडशी ७०, रायगडमधील बिरवडी ९२, खारवली ६१, महाड ५९, नाटे, तुडली येथे ५६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, जगबुडी, वशिष्ठी या नद्या भरून वाहत आहे. तर मोडकसागर, विहार, तुळशी, धामणी, तानसा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर धामणी धरणांतून ३२८५ क्युसेकने विसर्ग सोडला आहे.

विदर्भात हलका ते मध्यम पाऊस झाला. गडचिरोलीतील तरडगाव मंडलात ७८, तर भामरागड ५४, चंद्रपुरातील गोंडपिंपरी २०, तर सावळी, पाथरी, विहाड येथे २६ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात हलका पाऊस झाला. बाघ, वैनगंगा, कन्हान, बावनथडी वणा, प्राणहिता या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. इटियाडोह हे धरण १०० टक्के, तर पेंच, तोतलाडोह, इरई, ऊर्ध्व वर्धा, अरुणावती या धरणांतील पाणी पातळी ७० टक्केहून अधिक झाली आहे. इतर धरणांतही पाणीसाठा ५० टक्क्यांवर गेला आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव मंडलात २१, मंथा २०, पिंपरखेड ३४, हिंगोलीतील येहळेगाव येथे २० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात तुरळक सरी पडल्या. अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीकामे वेगाने सुरू आहेत. मराठवाड्यातील धरणांतील पाणी पातळी अजूनही फारशी वाढलेली नाही.

थोडक्यात महत्त्वाचे...

- कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
- कन्हेर, तारळी, कोयना, वारमा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव, खडकवासला, पवना, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, मुळशी या धरणांतून विसर्ग सुरूच
- कोकणातील मोडकसागर, विहार, तुळशी, धामणी, तानसा भरले
- विदर्भातील इटियाडोह धरण १०० टक्के
- मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ

शनिवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिमी)
कोकण : खर्डी २०, वसींड २४, कर्जत, कडाव, कशेले २२, चौक २२, जांभूळपाडा २७, करंजवडी २८, इंदापूर ३१, निजामपूर ३१, पोलादपूर, कोंडवी, वाकण ३९, रामपूर ४१, सावर्डे ४२, असुर्डे ४२, आंबवली, कुळवंडी ५१, कडवी, माखजन, फणसवणे ५६, तेर्ये ५६, बांदा ४७, आबोली ५२, तळवट ५२, खोडला ३२.

पश्‍चिम आणि मध्य महाराष्ट्र : पौड, माले, मुठे ७१, भोलावडे ७३, काले ६०, पानशेत ८९, विंझर ६६, बामणोली ५६, पाटण, म्हावशी ७४, हेळवाक ६०, मोरगिरी ५३, तळमावले ६६, तापोळा ६५, सागाव ५०, चरण ७२, पन्हाळा ५१, काळे ५४, पडळ ५३, बाजार ७२, कोतोली ५९, बांबवडे ५७, करंजफेन ७२, सरूड ५२, मलकापूर ९०, राधानगरी ५७, सरवडे ५५, कसबा ५७, साळवण ७२, सांगरूळ ८०, बीड ६८, हळदी ५८, गडहिंग्लज ५७, गारगोटी ७७, पिंपळगाव ५८, कडगाव ६६, कराडवाडी ७७, आजरा, गवसे ७७, चंदगड, नारंगवाडी ६७, माणगाव ९२, कोवाड ७३, तुर्केवाडी ९२, हेरे ६७.

विदर्भ : घोट २२, येनापूर ३४, भेंडाळा २६, सिरोंचा २७, पेंटीपका ४०, असारळी ३४, पेरमिली ४५, कमलापूर ३३, एटापल्ली ३८, कासंसूर ४०, जरावंडी ३९, गाट्टा ३४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT