Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढला; रेल्वेला फटका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाने काही भागांना झोडपले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी (ता.१४) देखील कोकणासह मुंबई, मुंबई उपनगर, पुण्यात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. यादरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्टचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईतील सखल भाग पाण्याखाली

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दमदार पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे कोकणासह मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बेस्ट बस मार्गांत बदल करण्यात आले असून काही भागात घरांचे नुकसान झाले आहे. यादरम्यान पुढील २४ मुंबईसाठी महत्वाचे असून अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

भिवंडीत मुसळधार, उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ

मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील खाडीलगत असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. तर प्रशासनाकडून येते कोणतीच आपत्कालीन यंत्रणा नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यादरम्यान उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने मोठी वाझ झाली आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढ झाल्याने येथील चौपाटी पुन्हा पाण्याखाली गेली आहे.

कोकणात वाऱ्याचा जोर वाढणार

कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढत आहे. तर ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून तो ६५ किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

रायगड मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यातील खोपोली परीसरात देखील मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले आहे. खोपोली शहारात देखील पाणी साचल्याने प्रवाशी आणि वाहतूकदारांना कसरत करावी लागत आहे. खोपोलीपरिसरात मागील २४ तासात २०० मिलीमिटरच्या आसपास पाऊस झाल्याने कर्जत-खोपोलीदरम्यान रेल्वे रूळावर पाणी आले आहे. त्यामुळे लोकल रेल्वे गाड्या धीम्या गतीने धावत आहेत. तर पावसामुळे वासिंद-आसनगाव, शहापूर ते आटगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई-नाशिक महार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोपडपून काढले

तसेच रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोपडपून काढले असून येथे दोन ठिकाणी दरड कोसळली. गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील तुळशी घाट आणि केळवत घाटात दरड कोसळली आहे. सध्या प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू असून भिंगळोली एसटी डेपो परसरात पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून मुसळधार पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात रात्रभर पाऊस

जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे होडावडे आणि कसाल कूंदे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतुक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाल्याने शेती पाण्याखाली गेली. तर मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पावसामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस वेग मंदावला आहे. तर निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेसला देखील पावसाचा फटका बसला असून ती सहा ते सात तास उशिराने धावत आहे.

पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी

गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने पुणे शहर आणि परिसरात हजेरी लावली आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली असून रविवारी देखील पहाटेपासून पाऊस सुरू आहे. तर पुण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात १०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. मावळ आणि भीमाशंकर परिसरात पावसाने डबल शेंच्युअरीची नोंद झाली आहे.

जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

जळगाव जिल्ह्यातील विविध भागात देखील पावसाची जोरदार बॅटिंग दिसून आली. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यानंतर रविवारी पहाटेवासून पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT