Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department Recruitment : राज्यात १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित प्रक्रिया वेगात पूर्ण करायचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच दिले आहेत.

एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

मात्र, अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरी होती. मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण ३ लाख १५ हजार ७६८ परीक्षार्थींनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण २ लाख ७१ हजार ८३८ परीक्षार्थी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ही सर्व प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार १५ ते ४४ दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल.

सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात ४४ दिवसांत, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात ४० दिवसांत तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी २० दिवसांत वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT