Karjat Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Karjat Market Committee Update : कर्जत बाजार समितीच्या दोन जागांची फेरमतमोजणी

Karjat Agriculture Produce Market Committee : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. दोन जागांसाठी २२ मे रोजी फेरमतमोजणी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिले आहेत.

Suryakant Netke

Market Committee Karjat News : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. दोन जागांसाठी २२ मे रोजी फेरमतमोजणी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिले आहेत. यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या गटाला प्रत्येकी ९ जागा मिळालेल्या आहेत. मतमोजणी होत असलेल्या दोन्ही जागांवर आमदार रोहित पवार गटांचे उमेदवार दोन-दोन मतांनी निवडून आलेले आहेत.

नगर जिल्ह्यात ज्या बाजार समित्याच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या, त्यात कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस झाली. त्यात आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गटाचे प्रत्येकी ९-९ उमेदवार निवडून आले.

चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांना प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आणि सभापती-उपसभापती निवडीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दोन जागांच्या फेरमतमोजणीचे आदेश आल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राम शिंदे गटाचे भरत पावणे व लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली. ही मागणी ग्राह्य धरीत जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्यासमोर वादी-प्रतिवादी यांच्यात युक्तिवाद होऊन सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्यासह उमेदवारांच्या साक्षी झाल्या.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील एक व महिला राखीव गटातील एक, आशा दोन जागांसाठी फेरमतमोजणीचे आदेश दिले आहेत. येत्या २२ तारखेला फेरमतमोजणी करण्यात येईल, अशी माहिती सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांनी दिली आहे.

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार यांच्या गटाला समान जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीनंतर २२ दिवसांनी फेरमोजणी होत आहे. दोन्ही उमेदवार दोन-दोन मतांनी निवडून आले आहेत. फेरमोजणी होणार असल्याने निकाल कायम राहणार की बदलणार याकडे लक्ष लागले आहे.

फेरमतमोजणीचे उमदेवार (कंसात मिळालेली मते)

सर्वसाधारण गट : गुलाब तनपुरे (आमदार रोहित पवार गट) विजयी (४५९,) भरत पावणे (आमदार शिंदे गट) ः (४५७)

महिला राखीव गट : सुवर्णा कळस्कर (आमदार रोहित पवार गट) विजयी (४७८), लीलावती जामदार (आमदार शिंदे गट) ः (४७५) मते मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

SCROLL FOR NEXT