Maize Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation: जळगाव जिल्ह्यात मका पीक एक लाख ८८ हजार हेक्टरवर

Cotton Decline: जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड घटेल, असा अंदाज सुरुवातीपासून असतानाच यंदा मका लागवडीत विक्रमी वाढ झाली आहे. अनेकांनी कापूस पीक टाळून मक्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख ८८ हजार हेक्टरवर मका पीक आहे.

Team Agrowon

Jalgaon News: कापूस लागवड घटेल, असा अंदाज सुरुवातीपासून असतानाच यंदा मका लागवडीत विक्रमी वाढ झाली आहे. अनेकांनी कापूस पीक टाळून मक्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख ८८ हजार हेक्टरवर मका पीक आहे. मका लागवड मागील हंगामात एक लाख ४० हजार हेक्टरवर पोचली होती. 

मका बियाणे टंचाईदेखील अधिकच्या बियाणे मागणीमुळे होती. तसेच मका बियाण्याचा काळाबाजारही काही भागात झाला. अनेकांनी काळ्या कसदार जमिनीत मका लागवड केली आहे. मका पीकस्थिती रावेर, यावल, अमळनेर भागांत हवी तशी नाही. अन्य भागात मका पीकस्थिती बरी आहे. पण मका लागवडीनंतर काही दिवस हलका ते मध्यम पाऊस आला.

जोरदार किंवा एकाच दिवसात ४० ते ४५ मिलिमीटर पाऊस न झाल्याने मका पीकवाढ सर्वत्र चांगली नाही. जोरदार पावसाची गरज असतानाच पावसाने दडी मारली आहे. अनेक भागात १३ ते १४ दिवसांपासून पाऊस नाही. काही भागात २० ते २५ दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे.

मका पिकात एक वेळेस बैलांकरवी आंतरमशागत झाली आहे. तसेच खतेही देण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९८ हजार हेक्टर एवढे आहे. परंतु यापेक्षा अधिकची मका लागवड झाली आहे. मक्यास रब्बीतही उठाव होता. मका पिकाची अतिपावसात हानी कमी होते. तसेच १२० ते १४० दिवसात मका पीक हाती येते.

तसेच अनेक  वाणही बाजारात खरिपासंबंधी आहेत. यामुळे अनेकांनी मका पिकास पसंती दिली आहे. मागील हंगामात मका पिकाची अतिपावसात हानी कमी झाली होती. यंदाही चांगला पाऊस असल्याचे भाकीत अनेकदा विविध संस्थांनी केले. यामुळे मका लागवडीत शेतकऱ्यांनी पसंती दिली. 

तणनाशकांना मागणी

मका पिकासाठी तणनाशकांचा वापर यंदा अधिक आहे. कारण मजुरांकरवी तणनियंत्रण करण्यासाठी एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. या तुलनेत तणनाशकासंबंधी खर्च कमी येतो. तसेच मजूर मिळत नसल्याने शेतकरी तणनाशकांचा उपयोग करून तणे नष्ट करून घेत आहेत. यंदा मका पिकातील तणनाशकांची विक्रमी विक्रीही होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT