Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Heavy Rain : अकोला, वाशीम जिल्ह्यांतील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी

Washim Rain Update : गेल्या ४८ तासांत या भागात पावसाने ठाण मांडले आहे. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील २४ तासांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : गेल्या ४८ तासांत या भागात पावसाने ठाण मांडले आहे. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील २४ तासांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. मालेगाव, मुंगळा या मंडलांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिक असा विक्रमी पाऊस नोंद झाला आहे.

गेले काही दिवस पावसासाठी आसुसलेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा तर दिलाच पण काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे नुकसानही होऊ शकेल, अशी परिस्थिती आहे.

मेहकरमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात रायपूर ९५.८, साखळी बुद्रुक ९२.८ अशी अतिवृष्टी झाली. मेहकर तालुक्यात अतिवृष्टी झाली. ८१.६ मिलिमीटर पाऊस नोंद झाला. या बहुतांश महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात मेहकर ९३, जानेफळ ७२, शेलगाव देशमुख ११७, डोणगाव ९३, हिवराआश्रम ६६.५, देऊळगावमाळी ६५.३, वरवंड ७२, लोणी ८२.५, अंजनी बुद्रूक ९३, नायगाव दत्तापूर ९२.५, लोणार तालुक्यातील सुलतानपूर ७०, हिरडव ६५.८, अंजनी खुर्द ६८.८ पाऊस झाला.

वाशीम जिल्ह्यात जोर अधिक

वाशीम जिल्हयात गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली. यात वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यांना पावसाने झोडपले. मालेगाव तालुक्यात विक्रमी १४५ मिलिमीटर पाऊस नोंद झाला. २४ तासांत मालेगावमध्ये २२१, मुंगळा २४२, शिरपूर ११३, किन्हीराजा ९२.८, मेडशी १३२,करंजी ११४, चांडस ९९.५ मिली पाऊस झाला. वाशीम तालुक्यातील सर्व मंडलांना अतिवृष्टीने तडाखा दिला.\

वाशीम १२५.८, पार्डी टकमोर १४३, अनसिंग ८९.५, राजगाव ७२, नागठाणा ११४, वारळा ११७, केकतउमरा ७२, कोंढाळा झांबरे १२५, पार्डी आसारे ११५, रिसोड तालुक्यात रिसोड ६७, वाकद ६८.३, केनवड ११७, गोवर्धन १४०, रिठद ७२.३, कवठा खुर्द ७०, मंगरुळपीर तालुक्यात धानोरा खुर्द १४३, कवठळ ६६, मानोरा तालुक्यात मानोरा ६८.५, इंझोरी ६६, कुपटा ७०, शेंदुर्जना १००, गिरोली १००, उमरी बुद्रूक ७५.५, कारंजा तालुक्यात येवता ७२.३

अकोला जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी दिली असून पातूर तालुक्यातील आलेगाव मंडलात तब्बल १४५ मिलिमीटर असा विक्रमी पाऊस झाला. काही तासातच ही अतिवृष्टी झाली. कुठे जोरदार, कुठे रिमझीम स्वरुपाचा पाऊस येतो आहे.

गुरुवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान मागील २४ तासांत पातूर तालुक्यात जोरदार असा ६८ मिलीमिटर पाऊस नोंद झाला. यात प्रामुख्याने आलेगाव मंडलात १४५, चान्नी ६६.५, बाभूळगाव ३१, पातूर ३०.५ मिली पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात २५, मूर्तिजापूर २६.३ तर अकोल्यात ११.२ मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

Cashew Truck Seized : कर चुकवून निघालेले काजूचे ट्रक ताब्यात

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

SCROLL FOR NEXT