Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation : धुळे, नंदुरबारला मका लागवडीत वाढ

Maize Sowing : धुळे व नंदुरबारातही मका लागवड वाढली आहे. मागील हंगामात कापूस बियाण्याची टंचाई जशी होती. तशी टंचाई यंदा मका बियाण्यासंबंधी काही भागात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा सुरूच आहे. लागवड विक्रमी स्थितीत आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड एक लाख ५१ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली असून, ही लागवड विक्रमी स्थितीत आहे. लागवड सुरूच असल्याने लागवडीसंबंधीचा आकडा आणखी वाढू शकतो.

धुळे व नंदुरबारातही मका लागवड वाढली आहे. मागील हंगामात कापूस बियाण्याची टंचाई जशी होती. तशी टंचाई यंदा मका बियाण्यासंबंधी काही भागात आहे. कारण लागवड अपेक्षेपेक्षा अधिक असून, बियाण्यास मागणी आहे. त्यात दोन-तीन कंपन्यांच्या मका वाणांना अधिकची मागणी आहे.

कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड सध्या सुरू आहे. लागवड १५ जूनपासून झाली आहे. अनेकांचे पीक २० ते २२ दिवसांचे झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या मका पिकात अमेरिकन लष्करी अळी दिसली. त्यात किडनाशके, अळीनाशकांची फवारणीदेखील घेण्यात आली आहे. पिकात काही भागात तणनाशकांची फवारणीदेखील एक वेळेस झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात लागवड वाढली, तशी लागवड नंदुरबार व धुळ्यातही वाढली आहे. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ६५ हजार हेक्टरवर मका पीक आहे. धुळ्यात शिंदखेडा, धुळे, शिरपूर, नंदुरबारात शहादा, तळोदा, नंदुरबारात मका लागवड अधिक आहे.

अधिक पावसातही पीक जोमात

अनेकदा अतिपावसातही मका पिकाची हानी ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस पिकाच्या तुलनेत कमी होते. तर कमी पाऊस असल्यास काळ्या कसदार जमिनीत मका पिकास फारसा फटका बसत नाही.

यामुळे काळ्या कसदार जमिनीतही मक्याची लागवड अधिक झाली आहे. मका पीक घेतल्यानंतर त्यात पुढे हरभरा व अन्य रब्बी पिके, भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मागील हंगामात अतिपावसातही मका पीक जोमात आले होते. त्याचे दरही टिकून होते. यामुळे अनेकांनी यंदाही मका पिकाची लागवड केली. तर अनेकांनी कापूस पीक कमी करून मका लागवड केल्याने मका लागवडीत सतत वाढ दिसत आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy : डॉलरचा फुगा फुटणार?

Interview with Popatrao Pawar: ‘व्हीएसटीएफ’ प्रकल्पाला संजीवनी देण्याची गरज

Wild Vegetables: आहारात हव्यात आरोग्यदायी रानभाज्या

Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न

Ganeshotsav 2025 : 'साम'च्या गणरायाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आरती

SCROLL FOR NEXT