Maize Snail Attack : उगवत्या अंकुरावर गोगलगायींचे आक्रमण

Kharif Season 2025 : खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाल्याने निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे.
Snail Pest
Snail PestAgrowon
Published on
Updated on

Nashik News : खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाल्याने निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, नुकतेच वर आलेले मका पीक गोगलगाय, पैसा (वाणी) आदी किडींच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले आहे. परिणामी, शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून, पेरणीनंतर लगेचच दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला आहे.

सध्या काही भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने कोवळी पिके टवटवीत आहेत. अशा अवस्थेत मातीतील आर्द्रतेचा फायदा घेत या किडींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जमिनीतून अंकुरलेली कोवळी रोपे या किडी रात्रीच्या वेळी कुरतडून टाकत असून, दिवसा मात्र त्या निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

Snail Pest
Snails Management : नुकसानकारक गोगलगायींचे व्यवस्थापन

पैसा किंवा वाणी ही एक निशाचर कीड असून, ती सामान्यतः कुजलेला कचरा खाणारी आहे. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीला, विशेषतः जास्त ओलावा असलेल्या जमिनीत, तिची संख्या अनियंत्रित वाढू शकते. यामुळे मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी यांसारख्या पिकांतील रोपे किडीच्या तावडीत सापडून मरत आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जमिनीखालून वर येणारे अंकुरच ही कीड नष्ट करत असल्याने पीक उगमाच्यावस्थेतच नष्ट होत आहे. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा विचार करावा लागत असून, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.

Snail Pest
Snail Control Solution: गोगलगायीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने नियंत्रण आवश्यक

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून मार्गदर्शन शिबिरे घेणे, किडीच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशके, सेंद्रिय उपाय याबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. कृषी विभागाने वेळेवर उपाय केले नाही, तर तालुक्यातील खरिपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतातील पालापाचोळा व वाळलेला, कुजलेला काडीकचरा गोळा करून नष्ट करावा. रात्री शेतात गवताचे ढीग करून ठेवावे व सकाळी या गवताच्या ढिगाखाली जमा झालेले किडे जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून त्यांचा नायनाट करावा. शेताच्या बांधावरील गवत व दगड काढून बांध मोकळा ठेवावा.
- मोतीराम भवर, नैताळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com