Maharashtra Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीसह ‘महाविकास’मध्ये बंडखोरी

Maharashtra Election Update : विधानसभा निवडणुकीत लढण्याची प्रबळ इच्छा असताना केवळ जागावाटपाच्या ‘फॉर्म्यूल्या’त सहकारी पक्षाला जागा सुटल्याने नाशिक जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीत उदंड बंडखोरी झाली.

Team Agrowon

Nashik News : विधानसभा निवडणुकीत लढण्याची प्रबळ इच्छा असताना केवळ जागावाटपाच्या ‘फॉर्म्यूल्या’त सहकारी पक्षाला जागा सुटल्याने नाशिक जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीत उदंड बंडखोरी झाली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पहिली बंडखोरी करत नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने दिंडोरी व देवळालीतील उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरविले आहे. याशिवाय मालेगाव, नाशिकमधील मतदार संघात बंडखोरी झाल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारांच्या अर्ज छाननीपश्‍चात बुधवारी (ता. ३०) जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदार संघांत ३३७ उमेदवार रिंगणात आहेत, तर २५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले.

अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी ‘एबी फॉर्म’च्या रूपाने बंडखोरीला खतपाणी मिळाले. भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात एकूण पाच जागा लढवत आहेत. त्यांपैकी नाशिक पश्‍चिममध्ये शशिकांत जाधव, चांदवडमध्ये माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, मालेगाव बाह्यमध्ये कुणाल सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

तीन जागा लढवत असलेल्या नाशिक मध्य मतदार संघाच्या इच्छुक उमेदवार डॉ. हेमलता पाटील, हनीफ बशीर, माजी नगरसेवक गुलजार. कोकणी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरोधात बंडखोरी केली. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, इगतपुरीत अनिता घारे यांची अपक्ष उमेदवारी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्ह्यातील पाच जागांसाठी उमेदवार दिले आहेत.

त्यांच्या पक्षातील येवल्याचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारले आहे. मालेगाव बाह्य मतदार संघात बंडुकाका बच्छाव यांनी त्यांच्याच पक्षातील उमेदवाराविरोधात बंड केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एकाही बंडखोराने अपक्ष उमेदवारी दाखल केलेली नाही.

शिवसेनेने शेवटच्या दिवशी दिंडोरीत धनराज महाले व देवळालीत राजश्री अहिरराव यांना ‘एबी फॉर्म’ दिल्यामुळे महायुतीत बिघाडी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये सुहास कांदे व मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनाच उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शेवटच्या दिवशी थेट हेलिकॉप्टरने फॉर्म पाठवून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम शिवसेनेने केले आहे.

मतदार संघनिहाय बंडखोरी

नांदगाव : समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

मालेगाव बाह्य : कुणाल सूर्यवंशी (भाजप), बंडू बच्छाव (शिवसेना उबाठा)

चांदवड : केदा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे (भाजप), संजय जाधव (काँग्रेस)

येवला : कुणाल दराडे (शिवसेना उबाठा)

दिंडोरी : धनराज महाले (शिवसेना, थेट एबी फॉर्म)

नाशिक मध्य : डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस), रंजन ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

नाशिक पश्‍चिम : शशिकांत जाधव (भाजप)

देवळाली : राजश्री अहिरराव (शिवसेना थेट एबी फॉर्म)

इगतपुरी : निर्मला गावित (उबाठा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT