Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Swapnil Shinde

Bhuladhana News : सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिल्याने आज बुलढाणा पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू केले आहे. सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस दरवाढ करावी, राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. तसेच पीक विम्याचा १०० टक्के पीक विमा भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या सांगता सभेत तुपकर यांनी सरकारने २८ नोव्हेंबर पर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर दि. २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT