Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar: शेतकरीप्रश्‍नी रस्त्यावरची लढाई लढणार : रविकांत तुपकर

Farmer Protest: शेतकऱ्यांचे पीकविमा, भाव फरक भरपाई, अनुदान आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाभर आंदोलनाची घोषणा केली आहे. आठवडाभरात मोठी यात्रा काढून सरकारवर दबाव वाढवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 गोपाल हागे

Buldana News: शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, सोयाबीन-कापूस भाव फरक, ‘नाफेड’मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, शेतीला कुंपण यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या घेऊन आठवडाभरात जिल्हाभर मोठी यात्रा काढण्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली.

सरकारवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्‍न लावून धरण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे जाहीर केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. २५) बुलडाण्यात झाली. या वेळी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. बैठकीत अनेकांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला.

तुपकर पुढे म्हणाले, की आपण कधीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आता जिल्हाभर यात्रा करणार आहे. नंतर मुंबईकडे कुच करणार आहोत.

महाराष्ट्रात शेतकरी चळवळी आता क्षीण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना पुढाकार घेणार आहे. आपल्या चळवळीवर लोकांचा विश्‍वास आहे. मी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे. यासाठी कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT