Farmer Protest : केंद्रीय कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांतील बैठकीत तोडगा नाहीच; पुढील बैठक १९ मार्चला

Next Meeting Scheduled for March 19 : चंडीगड येथील या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. डल्लेवाल यांचं उपोषण अद्यापही सुरू आहे.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

MSP Demand : केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि शेतकरी नेत्यातील दुसऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुढील बैठकीसाठी १९ मार्चपर्यंतची वेळ मागवली आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजता बैठक सुरू झाली होती. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मंत्री प्रल्हाद जोशी सहभागी झाले होते. यावेळी पंजाब राज्य सरकारकडून कृषिमंत्री आणि तीन मंत्री बैठकीत हजर राहिले. तर संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजूर मोर्चा मागण्यांवर ठाम राहिले. त्यामुळे केंद्र सरकारने आणखी वेळ मागवला आहे. परंतु तोडगा न निघाल्याने शेतकरी नेत्यांनी मात्र संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

चंडीगड येथील या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. डल्लेवाल यांचं उपोषण अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीसाठी डल्लेवाल यांना खनौरी सीमेवरुन चंडीगड येथे रुग्णवाहिकेत आणण्यात आलं. या बैठकीत मात्र चांगली चर्चा झाल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

Farmer Protest
Shivraj Singh Chouhan Meet SKM: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची आंदोलक शेतकरी नेत्यांशी आज बैठक

केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यातील तिसरी बैठक १९ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीला केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांसह पंजाब सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा तसेच कृषिमंत्री गुरमित सिंग खुडिया आणि अन्न प्रक्रिया मंत्री लालचंद कतरूचक उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी १४ फेब्रुवारी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली होती. या बैठकीत तोडगा निघाला नव्हता. शेतकरी नेते हमीभाव कायद्याच्या ग्यारंटीसह विविध मागण्यांवर ठाम आहेत. मागील वर्षभरापासून खनौरी आणि शंभू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.

तर २६ नोव्हेंबरपासून शेतकरी नेते जगजित डल्लेवाल उपोषणाला बसले आहेत. एक वर्ष या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या सरकारने आता मात्र आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे या चर्चेतून काही तोडगा निघेल का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, पंजाबमधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडून हमीभाव कायद्याच्या ग्यारंटीची मागणी केली आहे. जोवर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करत नाही तोवर शेतकरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com