Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Kokan Rain Update : रत्नागिरीत पावसाची विश्रांती, सिंधुदुर्गात जोर कायम

Monsoon Update : आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (ता. २९) जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पाऊस झाला त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता खचला. या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत.

Team Agrowon

Ratanagiri Rain Update : आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (ता. २९) जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पाऊस झाला त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता खचला. या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत.

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ३५५ मिमी पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत ५८८ मिमीची नोंद झाली होती. तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला. गेले दोन दिवस संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

गुरुवारी आषाढीच्या मुहूर्तावर पावसाने सकाळच्या सत्रात सुरुवात केली. एक मोठी सर पडून गेल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. सर्वच तालुक्यांत हेच चित्र होते. पावसामुळे चिपळूण तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली. सुमारे दोन तास वाहतूक थांबली होती.

झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. साखरपा ते देवरूख रस्त्यावर देवरूख येथे झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ते बाजूला करण्याचे काम सुरू होते. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गायवाडी येथील गजानन सनगरे यांच्या घराजवळील रस्त्याच्या बाजूची चिरेबंदी भिंत कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले.

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा ते निवळी येथे चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचल्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. येथे एका बाजूने वाहतूक सुरू आहे.

गुरुवारी (ता. २९) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९० मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगडमध्ये १०१ मिमी, दापोली १०३, खेड ७१, गुहागर १३१, चिपळूण ८४, संगमेश्‍वर ७५, रत्नागिरी ९४, लांजा ७९, राजापूरमध्ये ७२ मिमी पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोरड्या असलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसामुळे भातरोप पुनर्लागवडीच्या कामांनादेखील गती आली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. २७) जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. किनारपट्टीच्या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले त्यानंतर बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. गुरुवार (ता. २९) सकाळपासूनदेखील पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.

पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.शेतीच्या कामांनादेखील चांगलाच वेग आला आहे. भातरोप पुनर्लागवडीलादेखील गती आली आहे. मे अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार केलेल्या रोपवाटिकांतील रोपे पुनर्लागवडीयोग्य झाली असून या रोपांची लागवड सध्या जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत.

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून ‘आँरेज अलर्ट’ जारी केला आहे.

गुरुवारी (ता. २९) सकाळी ८.३० पर्यंत संपलेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस ः मालवण - ५८.३ मिमी, देवगड - ७३८, सावंतवाडी - ६९.९, वेंगुर्ला - ८०.५, कणकवली - ४८.१, कुडाळ - ५१.७, वैभववाडी -४२३, दोडामार्ग - ६७.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT