Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Rate : मांजरी परिसरात चाऱ्याचे भाव वाढले

Fodder Shortage : येथे जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले असून उसाच्या तोडी आता जवळ जवळ संपत आल्याने उसाचे वाढे मिळणे दुरापास्त झाले आहे.

Team Agrowon

Nagar News : येथे जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले असून उसाच्या तोडी आता जवळ जवळ संपत आल्याने उसाचे वाढे मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचबरोबर शेतात शेतकऱ्यांनी चाऱ्याची पिके न घेता रब्बीची पिके घेतल्याने यामध्ये गहू व हरभरा या पिकांची पेरणी केल्याने चारा पिकांची वानवा तयार झाली आहे.

उसाचा चारा आता प्रति टन २८०० ते ३१०० असा विकत आहे. आताच उन्हाळ्याची दाहकता बागायत पट्ट्यातील या गावांमध्ये दिसू लागली आहे. पुढील काळात पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

बहुतेक शेतकरी थोड्या फार प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन करतात. मात्र, बराचसा चारा बाहेरून विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू ठेवण्याचे नियोजन शेतकरी करीत असतात. मात्र, दुधाचा भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.

त्यामुळे ग्रामीण बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमालीची थंडावली आहे. उसाबरोबर मका, कडबा आदी पिकांनाही चाऱ्यासाठी चांगला भाव मिळत आहे. मात्र, पशुपालकांची चारा खरेदी करताना दमछाक होत आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली असताना चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने पशुपालकांनी चिंता वाढत आहे. बागायत पट्ट्यातील गावात ही स्थिती असल्याने या यंदा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक समीकरण कोलमडले आहे.
-दादाभाऊ विटनोर, पशुपालक, मांजरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Economic Survey 2025-26: देशाचा आर्थिक विकास दर ७.४ टक्के राहणार; शेतीचा विकास दर कमीच

Wheat Sowing: खपली गहू पेरणी खानदेशात अल्प

Grape Farming: पावसाची शक्यता, भुरीसह मणी तडकण्याच्या समस्येकडे लक्ष हवे

FPO: तामिळनाडूतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मजबुतीसाठी उच्चस्तरीय समिती, कृषी मंत्रालयाचा निर्णय

IAS Kiran Patil: विकसित भारतासाठी ‘आत्मनिर्भर बुलडाणा’ घडवू : किरण पाटील

SCROLL FOR NEXT