Farmer Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देवणीत ‘रास्ता रोको’

Farmer Demand : पीक कर्जावरील व्याजाचा परतावा मिळावा, पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची खाती होल्ड करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १९) देवणी येथे निलंगा-उदगीर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Latur News : पीक कर्जावरील व्याजाचा परतावा मिळावा, पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची खाती होल्ड करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १९) देवणी येथे निलंगा-उदगीर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून चक्काजाम झाला होता. शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवणे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देऊन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्री. जिवणे यांनी दिला. या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा देत सहभाग घेतला होता.

मुदत परतफेड केलेल्या पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा, पीकविमा व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, दिवसा आठ तास वीजपुरवठा करावा, पीककर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची बचत खाती होल्ड करून त्यांची अडवणूक करण्यात येत असून त्याची चौकशी करून संबंधित बँक अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सुरेंद्र आंबुलगे, मिथुन दिवे, गजानन उजळंबे, विकास नमनगे, मेळकुंदे, दत्ता अर्जुने, डॉ. अरविंद भांताब्रे, अमर मुर्के, देवणी तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष अजित बेळकोणे, सोमनाथ लुल्ले, देवीदास पंतगे, शरण लुल्ले, अरुण पाटील, औदुंबर पांचाळ, माधवराव बिरादार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT