Ladki Bahin Yojana Agrowo
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Women Empowerment: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै २०२५ महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्मान निधी ८ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे.

Sainath Jadhav

Pune News: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै २०२५ महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्मान निधी ८ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

रक्षाबंधन ९ ऑगस्टला असल्याने या निधीमुळे महिलांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याला महिलांसाठी सरकारची खास भेट असे संबोधले आहे.या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, सणासुदीसाठी खरेदी यासारख्या गरजा पूर्ण करता येणार आहेत.

रक्षाबंधन हा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार असल्याने, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सणाच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा सण अधिक गोड होईल. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना रक्षाबंधनाची अनमोल भेट दिली आहे. या निधीमुळे अनेक बहिणींचा सण खऱ्या अर्थाने सुखाचा आणि समृद्ध होणार आहे.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फुरित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ मिळतो.

यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि त्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेद्वारे दरमहा १,५०० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Issue: पावसाचा अडीचा डाव; पेरण्याही हिरमुसल्या

Maharashtra Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

SCROLL FOR NEXT