Sugarcane FRP Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP Rate : साखर सम्राटांना पायाखाली तुडवून दर मिळवणार, राजू शेट्टींचा इशारा

sandeep Shirguppe

Sangli Sugarcane News : उसाला ४०० रुपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सांगली जिल्ह्यात जनआक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेवेळी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या गळीत हंगामात गाळलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, यासाठी सांगलीतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून यात्रा सुरु झाली. उसाचा गतवर्षीचा हप्ता ४०० रुपये द्यावेत यासह यंदा प्रतिटनाला ४ हजारांहून अधिक दर द्या.

वजन काटे ऑनलाइन करा, द्राक्ष-बेदाण्याचा खप वाढविण्यासाठी टीव्हीवर जाहिरात सुरू करा, गाय दुधाला ५० रुपये, म्हैस दुधाला ६० रुपये हमी भाव द्या आदी मागण्यांच्या जनजागृतीसाठी शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करणे, शेतकऱ्याचे संघटन करणे त्या माध्यमातून सरकारवर व साखर सम्राट, दूध सम्राट अडत दुकानदार यांच्यावर दबाव टाकून शेतकऱ्यांक्या मागण्या मान्य घेण्यासाठी यात्रा काढली आहे. ती ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

‘स्वाभिमानी आपल्या शिवारात, स्वाभिमानी आपल्या गावात, स्वाभिमानी आपल्या दारात, समस्या तुमच्या उत्तर आमचे’ हे ब्रीदवाक्य घेऊन पदयात्रा काढली जाते आहे. पदयात्रा तब्बल २२ दिवसांची असून ६०० किलोमीटरची आहे. २२ मुक्काम आणि दररोज २५ किलोमीटर अंतर कापले जाईल. पदयात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावांतून जाणार आहे.

शेट्टी म्हणाले, ‘साखर कारखान्यांना ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. स्वाभिमानीची मागणी चुकीची नाही. तरीही, साखर कारखाने हा दर देणार नसतील आणि सरकार याला पाठीशी घालत असतील तर ‘जनआक्रोश’ केल्याशिवाय पर्याय नाही. जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील.

पदयात्रेत पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, भारत चौगुले, श्रीधर उदगावे, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, मानसिंगराव पाटील, शिवलिंग शेठे, सत्यसिंग गायकवाड, चंद्रकांत पाटील, अभिजित गावडे आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

अशी होणार जनआक्रोश यात्रा...

गुरुवारी मालगाव मक्काम. शुक्रवारी ( ता.१३ ) मोहनराव शिंदे कारखाना, १५ ऑक्टोबरला महांकाली कारखाना, २२ ऑक्टोबरला उदगिरी कारखाना, २३ ऑक्टोबरला नागेवाडी कारखाना, २६ ऑक्टोबरला डोंगराई, २७ ऑक्टोबरला सोनहिरा, २९ रोजी तासगाव कारखाना, १ नोव्हेंबरला क्रांती कारखाना कुंडल व हुतात्मा कारखान्यावर व पुन्हा ही यात्रा वसंतदादा कारखान्यावर पोहोचणार आहे.

शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यात पदयात्रा काढणार आहेत. त्यांची पदयात्रा क्रांती कारखान्यावर एक नोव्हेंबरला येईल. दोन्ही पदयात्राचा मिलाफ ‘क्रांती’वर होणार आहे. त्या हुतात्मा, वसंतदादा कारखानामार्गे सर्वोदय कारखान्याहून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT