Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राजू शेट्टींची कैफीयत पदयात्रा, सरकारला विचारणार जाब

Sugarcane FRP : मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा एफआरपी अधिक १०० रुपये मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता.

sandeep Shirguppe

Kaifiyat Padayatra Raju Shetti : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुध्दी मिळावी तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा.

यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिम्मीत्त कैफीयत शेतकऱ्यांची या पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा कागल ते कोल्हापूर अशी असणार आहे.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्द पाळलेला नाही. सध्या जाहीर केलेला हमीभाव ही केवळ ॲडजस्टमेंट आहे. सबसिडी देऊन भाव नियंत्रित करत असल्यामुळे शेतकरी

देशोधडीला लागलेला आहे. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी आज (ता.२६) जूनला कागल ते कोल्हापूर अशी कैफियत यात्रा काढली असल्याचे त्यांनी सांगितलं.

मागील वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक १०० रुपये मिळावेत अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली होती.

त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

स्वाभिमानीच्या आंदोलन काळात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांवर अन्याय केला पण सरकारने दिलेले शब्द पाळलेला नाही अशी खंत राजू शेट्टींनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT