amal mahadik vs satej patil agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sakhar Karkhana : २ वेळा विक्री करूनही राजाराम साखर कारखान्याचे कर्ज फिटणार नाही; वार्षिक सभेपूर्वी विरोधकांकडून आरोप

sandeep Shirguppe

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून ४७० कोटी रुपयांचे कर्ज आणि इतर देणी आहेत. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अमल महाडिक यांच्या चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे राजाराम कारखाना कर्जबाजारी झाला आहे.

सद्यस्थितीत राजाराम कारखाना दोन वेळा विकला तरी कारखान्याच्या कर्जाची परतफेड होणार नाही, असा आरोप राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी मोहन सालपे, बाबासाहेब देशमुख, विकास पाटील यांनी काल बुधवार (ता.२५) केला.

शुक्रवारी (ता.२७) राजाराम कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सालपे म्हणाले ,‘राजारामचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये कारखान्याचे भांडवली कर्ज, खेळते भांडवल कर्ज, इतर देणी, सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी घेतलेले १२४ कोटींचे कर्ज, एनसीडीसीकडून घेतलेले १७६ कोटींचे कर्ज, सध्या कारखान्याकडे शिल्लक साखर व स्टोअर्स माल यांची किंमत १४४ कोटी ७२ लाख रुपये आहे. तरीही १७० कोटी रुपये शॉर्ट मार्जिनमध्ये जाणारे आहेत. उत्पादन कमी आणि देणी जास्त अशी परिस्थिती आहे.

कारखान्याच्या स्व:मालकीची ८.६४ हेक्टर जमीन आहे. त्याचे शासकीय मूल्यांकन ४३ कोटी ३१ लाख ६९ हजार रुपये होते. गेल्यावर्षी चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन वाढवून १२१ कोटी ९२ लाख रुपये दाखवले होते. यावर्षी पुन्हा मूल्यांकन वाढवून १५५ कोटी केले आहे, असे एकूण २७७ कोटी मूल्यांकन दाखवून बँकांची दिशाभूल करून कारखाना कर्जबाजारी केला असल्याचा आरोप शाहू आघाडीकडून करण्यात आला.’

विकास पाटील (भुये) म्हणाले,‘मृत सभासदांची साखर नोंद असते, पण ती दिली जात नाही. निवडणुकीपूर्वी दिली जात होती. निवडणुकीनंतर अचानक ही साखर देणे बंद केले आहे. यामध्ये, काही तरी घोळ आहे.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT