Rajaram sakhar Karkhana Agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Factory : राजाराम साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ, सभागृहात प्रवेश नाकारल्याने सत्ताधाऱ्यांचा निषेध

sandeep Shirguppe

Amal Mahadik VS Satej Patil : केंद्र सरकारने प्रतिक्विंटल साखरेची विक्री किंमत ३१०० रुपयांवरून ३८०० रुपये करावी, कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना मारहाण करणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करावे यांसह विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर काल शुक्रवारी(ता.२७) झाली. सभागृहात केवळ सत्ताधारी गटाचेच सभासद असल्याने मंजूर-मंजूरच्या घोषणेने सभागृह दणाणले. दरम्यान विरोधकांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले.

सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली. तत्पूर्वी सभासदांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच कारखाना कार्यस्थळावर गर्दी केली. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांचे छायाचित्र असणारे झेंडे घेऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. हातात डिजिटल फलक आणि मंजूर-मंजूर असा शब्द लिहिलेले फलक घेऊनच त्यांनी सभागृहात प्रवेश केला. बघता-बघता सत्ताधाऱ्यांच्याच सभासदांनी सभागृह भरले.

सभेत अध्यक्ष महाडिक म्हणाले, ‘इथेनॉल प्रकल्पासाठी कारखाना स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विरोधातील काही सभासदांनी कारखान्याचे कार्यकारी संचालकांना मारहाण केली. अशा सभासदांवर कारवाईची मागणी सभासदांनी केली आहे. त्याचा विचार करून कारवाई केली जाईल.’

दरम्यान, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषय वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंदा चौगले यांनी आभार मानले. माजी आमदार महादेवराव महाडिक, दिलीप पाटील, दिलीप उलपे, तानाजी पाटील आदी संचालक उपस्थित होते.

सतेज पाटील गटाकडून समांतर सभा

छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या मयत सभासदांची साखर दिली जात नाही. चार हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतले जात नाही, कारखाना आत्ताच १७० कोटी रुपयांच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे. तरीही, कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची दिशाभूल करणारी उत्तरे दिली आहेत. याउलट आम्हाला सभागृहात प्रवेश दिला नाही, असा आरोप करत आमदार सतेज पाटील गटाच्या सभासदांनी सभागृहाबाहेरच समांतर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेले सर्व विषय नामंजूर करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, आले तसेच काय आहेत केळीचे दर ?

Sugarcane Season 2024 : चोवीस लाख टनांवर ऊस गाळपाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; उद्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहणार

Gharkul Yojana : ग्रामसभेला हवेत घरकुल लाभार्थी निवडीचे अधिकार

Onion Market : कांद्याला चांगला भाव तरिही शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे

SCROLL FOR NEXT