Bedana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Market Rate : पंढरपूरमध्ये बेदाण्याला ५११ रु. उच्चांकी दर, सोलापुरातही चांगला प्रतिसाद

Raisin Rate : नवा बेदाणा बाजारात येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी असला तरी जुन्या बेदाण्याचे भाव अजूनही टिकून आहेत.

Team Agrowon

Solapur News : नवा बेदाणा बाजारात येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी असला तरी जुन्या बेदाण्याचे भाव अजूनही टिकून आहेत. सोलापूर आणि पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पंढरपूर बाजार समितीच्या सौदे बाजारात बेदाण्याला उच्चांकी ५११ रुपये तर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ४०१ रुपये दर मिळाला आहे.

पंढरपुरात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव

बेदाणा सौदे बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला प्रतिकिलो उच्चांकी ५११ रुपयांचा भाव मिळाला आहे. आगामी काळात बेदाण्याला सोन्याचा भाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजार समितीमध्ये आजपर्यंतचा हा सर्वाधिक भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच झालेल्या बेदाणा सौदे बाजारात विक्रमी एक हजार ७५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यापैकी एक हजार ५०० टन बेदाण्याची विक्री झाली. बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला जवळपास ५११ रुपयांचा तर साधारण प्रतीच्या बेदाण्याला प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांचा दर मिळाला आहे. शेतकरी आकाश वसेकर यांच्या बेदाण्याला सर्वाधिक भाव मिळाल्याबद्दल बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार व शनिवार असे दोन दिवस बेदाण्याचे सौदे होतात. बाजारात आवक चांगली होत असून दरही चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपला शेतमाल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे. यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक सोमनाथ डोंबे, यासीन बागवान, महादेव लवटे, महादेव बागल आदी उपस्थित होते.

३३ बॉक्सला ५११ तर १० बॉक्सला ५०० रुपये दर

आडते स्वप्नील कोठाडिया यांच्या आडत दुकानामध्ये बार्डी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी आकाश धनाजी वसेकर यांनी बेदाणा विक्रीसाठी ठेवला होता. त्यांच्या ३३ बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ५११ रुपये उच्चांकी दर मिळाला.

सोमनाथ डोंबे यांच्या आडत दुकानामध्ये सोमनाथ महादेव गोरे (रा. कोन्हेरी, ता. मोहोळ) यांच्या १० बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाला आहे. तर लक्ष्मण दासू व्यवहारे (रा. करकंब, ता. पंढरपूर) यांच्या १९ बॉक्स बेदाण्याला ४२१ प्रती किलो दर मिळाला आहे. नामदेव विठ्ठल मोरे (रा. बावी, ता. माढा) यांच्या ७५ बॉक्स बेदाण्याला प्रतिकिलो ४०० रुपये इतका भाव मिळाला.

सोलापुरात सरासरी २३० रुपये दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात गुरुवारी (ता. १३) बेदाण्याला प्रतिकिलो सरासरी २३० रुपयांचा दर मिळाला. तर बाजारात एकूण ६ कोटी ९६ लाख ९० हजारांची उलाढाल झाली. गेल्या तीन सौद्यांपेक्षा यावेळेस आवक वाढलेली असतानाही त्या तुलनेत दरात २० रुपयांची वाढ झाली.

सोलापुरातील बाजार समितीत २० फेब्रुवारीपासून सौद्याला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रतिकिलो सरासरी १६० रुपये दर मिळाला. गेल्या तीन वर्षांत न मिळालेला अपेक्षित दर, त्यामुळे घटलेल्या बागा, यंदा कमी उत्पादन व कच्चा माल (द्राक्ष) विक्रीमुळे बेदाणा उत्पादनात घट झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT