Raisin Deals Rate Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Raisin Deals Rate Sangli : सांगलीत बेदाण्याचे सौदे सुरू; नवीन बेदाण्यास २२५ रूपयांचा दर

Sangli Market Yard : सांगली मार्केटमध्ये बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.

sandeep Shirguppe

Sangli Raisin Rate : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाण्याची सुरूवात झाली आहे. मुहुर्ताच्या सौद्याला तब्बल ३० टन बेदाण्याची आवक झाली. नवीन हिरव्या बेदाण्यास २२५, तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. सौद्यात सरासरी नवीन हिरव्या बेदाण्यास १८० ते २२५ रुपये, मध्यम बेदाण्यास १३० ते १७० रुपये दर मिळाला. यावेळी सांगली मार्केटमध्ये बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, "यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने नवीन बेदाणा कमी येण्याची शक्यता आहे. नवीन बेदाणा सौद्यात ७ दुकानात ३० टन नवीन बेदाण्याची आवक झाली होती. यादव ट्रेडर्स दुकानात खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास २२५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. नमो अ‍ॅग्रोटेक यांनी खरेदी केला. अक्षित सेल्स कार्पोरेशन या दुकानात नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास २२१ रुपये दर मिळाला. शिवानंद अ‍ॅग्रोटेक यांनी खरेदी केला".

हजारे सेल्स कार्पोरेशन या दुकानात अनंत चौगुले खंडेराजुरी यांचा पिवळा बेदाणा १९१ प्रति किलो दराने राजयोग एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला. त्यावेळेस मृर्गेंद्र अ‍ॅग्रोटेक, व्यंकटेश ट्रेडर्स, सहारा ट्रेडर्स, यादव ट्रेडर्स, सहारा ट्रेडर्स या दुकानात नवीन आवकेचा प्रारंभ झाला.

सौद्यांत हिरव्या नवीन सरासरी बेदाण्यास १८० ते २२५ रुपये, मध्यम बेदाण्यास १३० ते १७० रुपये, काळ्या बेदाण्यास ६० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला पिवळ्या बेदाण्यास १८० ते १९१ रुपये भाव मिळाला.

सभापती सुजय शिंदे म्हणाले,‘‘द्राक्ष छाटणी लेट झाल्याने, द्राक्ष लागण कमी आहे. मार्केटिंगचा दर चांगला असल्याने चालू वर्षी बेदाण्यास २०० रुपये प्रती किलोच्या पुढे भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत बेदाणा विक्रीसाठी आणावा.’’ असे आवाहन शिंदे यांनी केले.

सांगली बाजार समितीत चालू वर्षाच्या हंगामातील बेदाणा प्रारंभ सभापती सुजय शिंदे, संचालक आनंदराव नलवडे, शशिकांत नागे, प्रशांत पाटील, काडाप्पा वारद, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राजेंद्र कुंभार, सतीश पटेल, सुशील हडदरे, शेखर ठक्कर, शरद पाटील, हरिश्चंद्र पाटील, अर्णव गाडवे, सुनील खोत, ऋषभ शेडबाळे, रवी हजारे, इम्तियाज तांबोळी, दिगंबर यादव, अनिल पाटील, बेदाणा सौद्याचे देवेंद्र करे, नियमन प्रमुख कुमार दरूरे, अतुल जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT