Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : पावसाला पोषक हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Team Agrowon

Weather News : पुणे : गुजरातमधील कमी दाब क्षेत्राने बाष्प खेचून नेल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरातमधील वादळी प्रणालीपासून (डीप डिप्रेशन) पासून उदयपूर, शिवपूरी, चुर्क, दाल्तोंगंज, दिघा ते पूर्व-मध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यातच दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३४.४ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३० अंशांच्या पुढे सरकला.
कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओसरल्याचे दिसून आले. आज (ता. २९) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात एखाद दुसरी सर शिडकावा करण्याचा अंदाज अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
गुजरातमधील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) अरबी समुद्राकडे सरकत आहे. बुधवारी (ता. २८) ही प्रणाली गुजरातच्या भूजपासून ५० किलोमीटर वायव्येकडे, नालियापासून १०० किलोमीटर ईशान्येकडे होती. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. २९) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार असून, ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.


जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नगर, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या

Agri Crop Damage: लातूर जिल्ह्यात चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Papaya Price: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Land Acquisition Dispute: दमदाटी करून जमिनी का घेता?

Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT