Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कोकणात पुन्हा वाढला पावसाचा जोर

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदूर्गमधील वेंगुर्ला येथे १०८.७ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. यामुळे कोकणात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

कोकणात सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वेंगुर्ल्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तर सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्गात मुसळधार पाऊस झाला. याशिवाय रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांत देखील पावसाचा जोर वाढल्यामुळे भातरोपांच्या पुनर्लागवडीला वेग आला आहे.

खानदेशात अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, काही प्रमाणात ऊन पडत असल्याने पिके सुकत आहेत. शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात साताऱ्यातील महाबळेश्वर येथे २१.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोल्हापुरातील बावडा येथे ३२.९, भुदरगड १७.८, चंदगड १८.५ मिलिमीटर पाऊस पडला. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली भागांत अधूनमधून सरी आल्या.

मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतात मजूरांसह शेतकरी कामे करताना दिसत आहेत. मराठवाड्यातील बदनापूर येथे ११.३ मिलिमीटर, तर भोकर येथे १९.५, हिमायतनगर १७.६, पाथरी १८.९, जिंतूर १५.९, सेनगाव ११.९ मिलिमीटर पाऊस पडला.

तर विदर्भातील अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथे ४२.६ मिलिमीटर पाऊस पडला. तर यवतमाळमधील कळंब येथे ४१.६ मिलिमीटर पाऊस पडला. देवळी ३८.१, नरखेड ३८.५, हिंगणघाट येथे २७.३ मिलिमीटर पाऊस पडला. पावसामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

कोकण : अलिबाग ५३.६, सुधागड ५९.७, पेण ५२.९, महाड ७३.४, रोहा ८७.६, मुरूड ८९.६, श्रीवर्धन ५३.२, म्हसळा ५१.४, तला ७२.८, चिपळून ६३.०, दापोली ८२.३, खेड ७२.८, गुहागर ९८.३, मंडणगड ५५.५, रत्नागिरी ७९.३, संगमेश्वर ५१.३, राजापूर ७०.३, देवगड ५३.२, मालवण ७५.१, सावंतवाडी ८६.०, कणकवली ६८.२, कुडाळ ८२.७, वैभववाडी ५७.६, दोडामार्ग ६९.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT