Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधारा; काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी (ता.२२) काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर वाशिम जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे तूर आणि हळद पिकाला चांगला फायदा होणार आहे.

धाराशिवच्या भुम तालुक्यात जोरदार पाऊस

धाराशिवच्या भुम तालुक्यातील काही ठिकाणी शनिवारी रात्री (ता.२१) जोरदार पावसाने हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेला. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. तर तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला आहे.

वर्धा : वायफड गावात ढगफुटीसदृश्य पाऊस

वर्ध्यात देखील शनिवारी (ता.२१) पावसाच्या अनेक ठिकाणी सरी कोसळल्या. यावेळी वायफड गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने गावातील रस्ते पाण्याखाली गेली होती. तर पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान हवामान विभागाने आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (ता.२२) देखील वर्धा जिल्ह्यात सकाळपासून विजाच्या कडकडाटसह पाऊस झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फटका बसला आहे. तर शनिवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे खरिप पिकांना मदत झाली आहे.

यवतमाळमध्ये सरी कोसळल्या मात्र...

यवतमाळ जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे येथील पिके धोक्यात आली होती. पण शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह अनेक भागात रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लातूर : उजनी परिसरात जनजीवन विस्कळीत

लातूर जिल्ह्यातही अनेक भागात शनिवार पासून ढगाळ वातावरण वातावरण झाले होते. दरम्यान लातूरमधील हेर येथे ३२ मिलिमीटर पाऊस झाला. औसा तालुक्यातील उजनी परिसराला देखील शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे उजनी, एकंबी तांडा उजनी-मासुर्डी या गावांना जोडणारा रस्ता ओढ्याला पूर आल्याने काही काळ बंद करण्यात आला होता. यावेळी ओढ्याच्या पलीकडे अडकलेल्या लोकांना ग्रामस्थांनी मदत कार्य करत गावात परत आणले.

परभणीच्या नागरिकांना दिलासा

अतिवृष्टीनंतर परभणीतून पाऊस गायब झाला होता. पावसाने पुन्हा एकदा परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागात शनिवारी सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पण गर्मीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

तूर आणि हळद पिकांना आधार

वाशिम जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तूर आणि हळद पिकाला चांगला फायदा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात मागील १० ते १५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. यामुळे तूर आणि हळद पिकाला पाण्याची गरज होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. पण शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळं तूर आणि हळद पिकाला आधार मिळाला आहे. दरम्यान हवामान विभागानं पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT