Marathwada Rain : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

Rain Alert : मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : दीर्घ पावसाच्या खंडानंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत धाराशिवमधील कळंब येथे सर्वाधिक १३८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. दिवसभर पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती होती.

मागील काही दिवस कडक ऊन पडल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीकामांना वेग आला होता. त्यातच आता परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. कोकणातील रत्नागिरीतील भांबेड येथे ३७ मिलिमीटर, तर बुरोंडी २०, दाभोळ १०, कडवई, फणसवणे, तेर्ये १९, देवळे २२ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain
Maharashtra Rain Alert : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सुरु होणार; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील रावेर, निंभोरा, ऐनपूर येथे हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील नगरमधील वाळकी येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस झाला. तर पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुण्यातील लोणी देवकर येथे २३ मिलिमीटर, तर बावडा येथे हलका पाऊस पडला. सोलापुरातील म्हैसगाव येथे ५७ मिलिमीटर पाऊस पडला. सांगलीतील ढालगाव येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain
Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा इशारा

मराठवाड्यातील लातूरमधील हेर येथे ३२ मिलिमीटर, तर उदगीर, नागलगाव, वाढवणा, नळगिर, मोघा, देवार्जन, आष्टा येथे हलका पाऊस झाला. धाराशिवमधील जवळा येथे ८३ मिलिमीटर, तर मोहा ८२, परांडा ४५, आसू ५०, सोनारी ५०, माणकेश्‍वर ३४, इतकूर ४०, येरमाळा ३१ मिलिमीटर, नांदेडमधील सिरजखोड येथे ७४ मिलिमीटर, तर दाभड येथे ३३ मिलिमीटर, तर अर्धापूर, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा, वाजेगाव, नळेश्वर, लोहा, कापसी, सोनखेड येथे हलका पाऊस झाला.

पाऊस दृष्टिक्षेपात...

पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर भागांत हलका पाऊस.

सांगली ढगाळ वातावरण.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.

परभणी शहर व परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस.

सातारा शहरात पावसाची हजेरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com