Paddy Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : पावसामुळे पेरणीला सुरुवात

Kharif Sowing : श्रीवर्धन तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीसाठी बी-बियाण्यांच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Raigad News : श्रीवर्धन तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीसाठी बी-बियाण्यांच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे. तालुक्यात एकूण चार कृषी सेवा केंद्रे असून २०१ क्विंटल भात बी-बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात नारळ, सुपारी व आंब्यानंतर प्रामुख्याने भात व नाचणीचे पीक घेतले जाते. तालुक्यात प्रयोगशील शेतकरी दरवर्षी आपापल्या शेतामधून वेगवेगळ्या जातींच्या भाताचे वाण आणून पेरणी करतात. तालुक्यातील मातीचा गुणधर्म चांगला असल्याने भाताचे उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळते.

आधुनिक काळातही श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी शेताची नांगरणी बैल व नांगराच्या साहाय्याने करीत आहेत. श्रीवर्धन तालुक्यात एकूण १,४०३ हेक्टर भाताचे तर ८४ हेक्टरमध्ये नाचणीचे पीक घेतले जाते. नाचणीचे बी-बियाणे कृषी सेवा केंद्रामधून मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिले जाते. ३० टक्के शेतकरीवर्गाने मागील वर्षी बी-बियाण्यांचा वापर केला आहे

मॉन्सून बरसल्याने आनंद

खोपोलीसह खालापूर परिसरात गुरुवार व शुक्रवारी दोन दिवस पाऊस बरसला. यामुळे तालुक्‍यात भातपेरणीला चालना मिळाली असून शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी मेमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने पेरणीपूर्व कामे जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्णत्वास आली आहेत. एका आठवड्याच्‍या प्रतीक्षेनंतर गुरुवारी व शुक्रवारी मॉन्सून बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता योग्य वातावरण मिळाल्याने भातपेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. पेरणी, रोपे योग्य वाढल्यावर पुढील पंधरा दिवसांनी भातलागवडीची कामे केली जातील, असे सांगण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT