Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत पावसाची हजेरी

Rain News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अनेक भागांत शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम, दमदार हजेरी लावली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अनेक भागांत शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम, दमदार हजेरी लावली. बीडमधील गेवराई व आष्टी तालुक्यांतील प्रत्येकी एका मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली.

महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सून जसा पुढे सरकतो तसतसे अनेक भागांत पावसाचे आगमन होताना दिसते आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास ३७, जालनामधील ४३ मंडलांत, तर बीडमधील एखाद दुसरा अपवाद वगळता पावसाची सर्वदूर हजेरी लागली. जालना जिल्ह्यातील परतूर, बीडमधील गेवराई, आष्टी, पाटोदा, बीड तालुक्यांत पावसाचा जोर पाहायला मिळाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तीन ते चार मंडलांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर मंडलांत झालेला पाऊस तुरळक, हलका होता. मंडलातील अनेक गावांमध्ये अजून पावसाचे अपेक्षित आगमन झाले नसल्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणी पावसाचे दमदार आगमन झाले. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची लगबग वाढवली आहे.

दुसरीकडे ज्या ठिकाणी पावसाचे अपेक्षित आगमन झाले नाही. त्या ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना तसेच खते, बी- बियाण्याची सोय लावण्याच काम करताना शेतकरी दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा मंडलात ७५.३ मिलिमीटर, तर गेवराई तालुक्यातील धोंडराई मंडलात ७९.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

पाऊस मिलिमीटर

बीड जिल्हा

बीड १९, पाली ३१, राजुरी २२.३, पिंपळनेर २०.५, पेंडगाव २५.३, मांजरसुंबा २५.३, चौसाळा ४४, नेकनूर ३२.८, लिंबागणेश १८.५, पाटोदा ३५.३, दासखेड ४५.८, थेरला ४६.८, अमळनेर १७.८, टाकळसिंग ३३.५, दावलावडगाव २०, धामणगाव २७.३, मादळमोही ३५.५, पाचेगाव ३०.५, उमापूर ३८.३, चकलांबा ३३, सिरसदेवी २७, रेवकी ३१, तालखेड २८.३, युसूफ वडगाव २२, नांदूरघाट ३४.३, शिरूर कासार २४.८, तिंतरवणी २०.३.

जालना जिल्हा

पाचनवडगाव ३१, परतुर ३९.३, वाटुर २२.८, आष्टी ५४, श्रीष्टी ३०, सातोना १२.५, घनसावंगी २३.३, राणी उचेगाव १४, तीर्थपुरी २२.८, कुंभार पिंपळगाव १५.५, रांजणी ११.३, मंठा ११.३, ढोकसाळ १३.५.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

पिंपळवाडी १८.८, ढोरकीन २३.३, बिडकीन १७.३, पैठण १०.८, निलजगाव ११.३

१ ते ७ जून दरम्यान ६ मंडलांत अतिवृष्टी

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी जालना बीड परभणी हिंगोली या चार जिल्ह्यांतील सहा मंडलांत एक ते सात जून दरम्यान अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, आष्टी तालुक्यातील कडा, गेवराई तालुक्यातील जातेगाव, धोंडरई, परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर या मंडलांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT