Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain Alert : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Vidarbha Monsoon Alert : आज (ता. २०) विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Vidarbha Weather Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. २०) विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला आहे. मॉन्सूनचा आस गंगानगर, नार्नुल, दातिया, सताना, कमी दाबाचे केंद्र, बालासोर आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात ढगाळ हवामान होत आहे. उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १९) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्र कायम

बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि परिसरावर सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT