Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस, वाऱ्याचा जोर वाढला

Latest Rain Update : कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे शेकडो मासेमारी नौका देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. किनारपट्टी भागाला पावसाने झोडपून काढले.

अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव सध्या किनारपट्टीसह जिल्ह्याच्या उर्वरित भागात जाणवू लागला आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला असून वाऱ्याचा वेग देखील वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.२९) रात्रीपासूनच जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि देवगड किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

काही ठिकाणी वाऱ्याचा वेगामुळे पडझड झाल्याचे प्रकार ही घडलेले आहेत. याशिवाय सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. सकाळपासून या सर्व भागात पाऊस पडत होता. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. मात्र सायकांळी चार-पाच वाजल्यानंतर या दोन तालुक्यांत देखील दमदार पावसाला सुरुवात झाली.

कणकवली तालुक्यातील डिगस येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. याशिवाय किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये देखील काही ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले असून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हवेत देखील गारवा निर्माण झाल्याचे चित्र आहे. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे शेकडो मासेमारी नौका देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत.

सध्या पडत असलेल्या पावसाचा भातपिकावर अजून फारसा परिणाम झालेला नसला तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास परिपक्व झालेल्या भातपिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवार (ता.३०) सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाच्या सरी सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Market: खानदेशात केळीच्या आवकवाढीस सुरुवात

local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान

Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकारण तापणार

Grape Export: द्राक्ष निर्यातीस कासवगतीने सुरुवात

Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस

SCROLL FOR NEXT