Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop In Crisis : पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात

Kharif Season 2025 : मे महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने या भागात तूर, सोयाबीन, मूग, बाजरी, मका ही सर्व पिके जोमात आली. परंतु जून व जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली आहेत.

Team Agrowon

Akkalkot News : परिसरात खरीप हंगाम पावसाने पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. नागणसूर, तोळणूर, हैद्रा, मराठवाडी, गुरववाडी, नाविंदगी, गौडगाव, कडबगाव, जेऊर, बोरोटी, कलप्पावाडी, सातनदुधनी आदी भागात खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने या भागात तूर, सोयाबीन, मूग, बाजरी, मका ही सर्व पिके जोमात आली. परंतु जून व जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली आहेत.

या भागातील सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, या भागात गेल्या दीड दोन महिन्यांपासून एकदाही मोठा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या भागात अद्यापपर्यंत वीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही.

नागणसूर मंडलात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे या भागात खरिपाची पिकांची वाढ खुंटल्यामुळे पिके हाताला लागतील की नाही अशी शक्यता आहे. या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी पीकविम्याची रक्कम वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे विमा रक्कम वाढल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

भागात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटल्यामुळे आमच्या हाती लागत नाही. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राजशेखर पाटील, शेतकरी, तोळणूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT