Ashadhi Ekadashi Festival: आगामी आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पालखी मार्ग, पालखीतळ आणि विसाव्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य व सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार, असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली..श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे आयोजित आषाढी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..Rail Project Development: दौंड-वाडी लोहमार्गाचे चौपदरीकरण.श्री. कार्तिकेयन म्हणाले, पालखी मार्गावरील खड्डे व रस्त्यांची दुरुस्ती वारीपूर्वी तातडीने करावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाहणी करून कार्यवाही करावी. त्याशिवाय पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा आणि पुरेशा शौचालयांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रणा तैनात केली जाईल. .Solapur DPC Funds: डीपीसीचा निधी १५ दिवसांत द्या: खा प्रणिती शिंदे.पालखी मार्गावरील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी 'फूड सेफ्टी ऑन व्हील' या मोबाईल व्हॅनची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच, आपत्तीकालीन परिस्थितीसाठी वारी काळात खासगी रुग्णालयांनी १० टक्के बेड राखून ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. , असेही ते म्हणाले. बैठकीस पोलीस, महसूल, आरोग्य, पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा नियोजन विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते..सीसीटीव्हीद्वारे लक्षसुरक्षेच्या दृष्टीने वाखरी, ६५ एकर (भक्ती सागर), वाळवंट, मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. या सर्व यंत्रणांचे संचलन एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून केले जाणार आहे, असे सांगताना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पीपीटीद्वारे प्रशासकीय नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पालखी सोहळ्यांचे मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि मंदिर समितीमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.