Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

Pune Rain Alert : पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मॉन्सूनोत्तर पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत गुंजवणी आणि नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक ३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Team Agrowon

Pune News: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मॉन्सूनोत्तर पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत गुंजवणी आणि नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक ३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील २६ धरणे मिळून एकूण ०.४५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

देशातून परतीचा पाऊस गेल्यानंतर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे कडक ऊन पडत असल्याने उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल झाले आहे.

दिवसभर काही प्रमाणात ऊन पडत असले तरी सायंकाळनंतर वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे रात्री किवा पहाटे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये नीरा खोऱ्यातील वीर धरण क्षेत्रात ३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर भाटघर धरणक्षेत्रात ३० मिलिमीटर, नाझरे १२, शेटफळ ११ मिलिमीटर पाऊस झाला. कासारसाई, कळमोडी, आंध्रा धरणक्षेत्रात पावसाचा शिडकावा झाला. मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणक्षेत्रांत तुरळक सरी बरसल्या.

कुकडी धरणक्षेत्रातील येडगाव धरणक्षेत्रात २८ मिलिमीटर पाऊस पडला. तर वडज आणि डिंभे धरण क्षेत्रात तुरळक सरी कोसळल्या. उजनी धरणक्षेत्रात १७ मिलिमीटर पाऊस पडला. मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे ओढ्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाला होता. परंतु आता होत असलेल्या या पावसामुळे ओढे, नाल्यातून पुन्हा पाण्याचा प्रवाह कमीअधिक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT