Maharashtra Budget 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवांसाठी घोषणांचा पाऊस; सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

Vidhansabha Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि युवा वर्गासाठी लोकप्रिय घोषणा करून सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न केला.

Anil Jadhao 

Pune News : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि युवा वर्गासाठी लोकप्रिय घोषणा करून सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्थसंकल्पात एकूण ६ लाख १२ हजार कोटी रुपयांची तरतूद दाखविली. तसेच महसुली तूट २० हजार कोटी आणि १ लाख १० हजार कोटींचा रोजकोषीय तूट असलेला अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (ता. २८) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पी भाषणाची सुरूवात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने केली. आगामी आर्थिक वर्षासाठी वार्षिक योजनांसाठी १८ हजार १६५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत तो २० टक्क्यांनी अधिक आहे. यात एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये महसुल जमा होईल, असे म्हटले आहे. तर ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये महसुली खर्च दाखविण्यात आला. त्यामुळे २० हजार ५१ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित आहे. तर राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये आहे.

पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांनी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले होते. या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी ‘आई योजना’ सुरू केली आहे. यातून दहा हजार रोजगार निर्मिती होईल. या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ होईल. त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा भार सरकार उचलेल.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता दिला जाणार आहे. तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. या महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदी

६ लाख १२ हजार २९३ कोटी
एकूण तरतूद

४ लाख ९९ हजार ४६३ कोटी
महसूली जमा

५ लाख १९ हजार ५१४
महसूली खर्च

१ लाख ९२ हजार
वार्षिक योजना कार्यक्रम खर्च

२० हजार ५१ कोटी रुपये
महसुली तूट

१ लाख १० हजार ३५५ कोटी
राजकोषीय तूट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT