Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी धो धो पाऊस

Team Agrowon

Pune News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी धो धो पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मंगळवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत बीडमधील पेंडगाव येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे दुष्काळी भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

मध्य महाराष्ट्र, खानदेशात सर्वत्र पाऊस

मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यांत मागील तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कापूस, तूर, बाजरी पिकांना दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले वाहते झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होता. इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहत असून, शेतातही पाणीचपाणी साचल्याने काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिकमधील जोगमोडी, नायगाव येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली. नगरमधील वडझिरे येथे ९५ मिलिमीटर पाऊस झाला. दरवर्षी कमी पडत असलेल्या तालुक्यात पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. सोलापूरमध्येही सर्वदूर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून, शेतात चांगलेच पाणी साचले होते. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कमीअधिक पाऊस पडला. खानदेशात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतही सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर नंदुरबार जिल्ह्यात हलका पाऊस झाला आहे.

मराठवाड्याला पावसाचा दिलासा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील तुर्काबाद येथे ८३ मिलिमीटर पाऊस पडला. तर गंगापूर, भेंडाळा, शिवूर, बोरसर अशा अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. बीडमधील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कापूस पिकांना चांगलाच आधार मिळाला. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडला. नांदेडमधील तुप्पा येथे ३९ मिलिमीटर, तर किनवट ४६, सिंदगी ४२, उमरी बाजार ४१, वाई ३९, धानोरा येथे ७१ मिलिमीटर, परभणीतील बामणी येथे ६७ मिलिमीटर, तर आवलगाव ८३, शेळगाव ८१, वडगाव ७५, मानवत येथे ४३ मिलिमीटर, हिंगोलीतील हयातनगर येथे ६७ मिलिमीटर, तर साखरा ४२, पानकनेरगाव ५५, हत्ता येथे ४४ मिलिमीटर पाऊस झाला. बीडमधील पाडळी, चौसाळा, पेंडगाव येथे १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी चांगलेच सुखावले आहेत.

विदर्भात तुरळक सरी :

विदर्भात कमीअधिक पाऊस पडत आहे. पश्‍चिम विदर्भात आतापर्यंत कमी पाऊस झाला असला तरी आता या भागात पावसाने दमदार हजरी लावली आहे. बुलडाणा, वाशीम, अमरावती जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस झाला. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. बुलडाण्यातील पळशी, अडगाव येथे ५५ मिलिमीटर, तर शेगाव ४८, जलंब येथे ६३ मिलिमीटर, अकोल्यातील बाळापूर येथे ५४ मिलिमीटर, तर चान्नी ६६, सस्ती ४६, यवतमाळमधील लोहारा येथे ४२ मिलिमीटर, तर उमरखेड ५७, विदूल ४०, हिवरा ४५, फुलसांगवी येथे ४९ मिलिमीटर, नागपूरमधील कान्होलीबारा येथे ४५ मिलिमीटर, तर जलालखेडा ५१, मेंधळा ५१, पाटनसावंगी येथे ४३ मिलिमीटर, गोंदियातील मोहाडी, तिल्ली येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला.

कोकणात जोर वाढतोय :

कोकणात मागील काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे ३३ मिलिमीटर, तर खर्डी येथे ४६ मिलिमीटर, रायगडमधील मोराबी ३१, रत्नागिरीतील कोंडगाव २९, सिंधुदुर्गमधील देवगड येथे ३४ मिलिमीटर, तर मीठबाव ३०, पोइप ४४, म्हापण ६०, कणकवली, फोंडा, सांगवे येथे ३७ मिलिमीटर पाऊस झाला.

मंगळवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग)

मध्य महाराष्ट्र : झोडगा ५६, कळवाडी ६१, सायणे ४२, बागलाण ४७, ब्राह्मणगाव ५४, मुल्हेर ३४, कळवण ५३, नवी बेज ४४, नांदगाव ५३, हिसवळ ४३, सुरगाणा ४१, नायडुंगरी ५१, नाशिक ४६, देवळाली ३२, सातपूर, पाथर्डी ३०, वरखेडा ३९, बोरकुंड ३७, आर्वी ३५, भुसावळ ४७, कुऱ्हे ३७, फैजपूर ३६, बामणोद ४४, ऐनपूर ३२, शिरूड ५२, रिंगणगाव ४२, पारोळा ५२, शेळावे ४२, बहादरपूर ५२, शिरसगाव ४०, मेहुणबारे, खडकी ३६, धरणगाव ४३, नालेगाव ३०, नागापूर ४१, चास ३७, रुईछत्तीसी ३०, सुपा ३६, वाडेगव्हाण ३७, शेवगाव ३५, माणिकदौंडी ४८, मिरी ३२, नेवासा खुर्द ३९, राहुरी, टाकळीमिया ७०, वांबोरी ४१, सणसर ९५, उरुळीकांचन ४५, खेड शिवापूर ६२, भोर ५१, वेळू ६२, इंदापूर ७५, बावडा ६०, निमगाव ४०, रावणगाव ५२, शेळगी ६४, वडाळा ४१, सोलापूर ८१, बोरामणी ४७, विंचूर ५०, वैराग ७१, पांगरी ५४, नारी ४०, जेऊर ८१, तडवळ ६९, करजगी ३९, नरखेड ४६, सावळेश्‍वर ७६, शेटफळ ४०, मोहोळ ६८, कुर्डुवाडी ६३, म्हैसगाव ४२, टेंभुर्णी ७९, लऊळ ७६, जेऊर, उमरड ४९, कासेगाव ३९, सांगोला ६६, शिवणे ५६, जवळा ३५, हातीद ६७, कोळा ५३, संगेवाडी ३६, माळशिरस ४०, सदाशिवनगर ४४, दहिगाव ४३, अकलूज ३९, मारापूर, मंगळवेढा ४६, हुलजंती ८६, वाठार-स्टेशन ५२, किन्हई ४९, औंध, पुसेसावळी ५९, मायणी ४६, फलटण ७८, आसू ५८, आदर्की ४०, राजाळे ६७, शिरवळ ६०, आरग ८१, मिरज, मालगाव ४२, जत ४६, डफळापूर ८६, तिकोंडी ४१, करंजे ५२, भाळवणी ५०, पेठ ८३, कामेरी ५२, मनेराजुरी, वायफळे ५२, तासगा ४९, भिलवडी ४४, राधानगरी ६०, गगनबावडा ४६, कडगाव ७३

मराठवाडा : गंगापूर ६०, मांजरी ४९, भेंडाळा ४८, वाळूज ५३, असेगाव ५१, जामगाव ४९, शिवूर, बोरसर ५२, जानेफळ ४८, चिखलठाणा ७९, पाळोद ५९, केदारखेडा ७६, माहोरा ४७, जालना ग्रामीण ६६, विरेगाव ६२, मंथा ४५, बीड ६३, पाडळी १०१, राजुरी ९४, पेंडगाव ११२, मांजरसुभा ९३, चौसाळा १११, लिंबागणेश ९५, पिंपळा ६३, घाटनांदूर ८३, केज ६६, परळी ५१, पिंपळगाव ५६, धारूर ९६, कासारखेडा ४०, वाडवळ ३९, झरी ५०, अष्टा ४०, धाराशिव ग्रामीण १०४, जागजी ८०, तुळजापूर ४७, जवळा ४६, गोविंदपूर ४९, पारगाव ७३.

विदर्भ : चांदई ४०, रायपूर ४९, म्हसला ७१, तुळजापूर ४५, डोणगाव ५७, मलकापूर ४२, सुलतानपूर ९३, हिरडव ६२, अंजनी ४९, खामगाव ४१, अनसिंग ४८, वारळा ६२, पार्डी आसरे ४५, वाकद ५५, गोवर्धन ४५, मालेगाव ६०, आसेगाव ५७, धानोरा ४७, मानोरा ४४, गिरोली ४१, हरीसळ, सेमडोह ६६, वरखेड ५२, कुऱ्हा ५३, मोर्शी ६६, अंबडा ४२, भेंनोडा ६६, वाठोदा ५१, करंजगाव ५३, शिरजगाव ५७, अहेरी ६१, आलापल्ली ४४, पेरमिली ५३, कांमानचेरू ४८, एटापल्ली ७५.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोर; मूग, उडदाला फटका

कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढला.

मध्य महाराष्ट्र, खानदेशात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस.

मराठवाड्यात बीड, नांदेड भागात पावसाचा जोर.

विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस.

कोकण घाटमाथ्यावर पावसाची उघडीप.

काढणीच्या अवस्थेतील मूग, उडीद, सोयाबीन पिकांना नुकसानकारक.

...येथे पडला सर्वाधिक पाऊस, मिलिमीटरमध्ये :

ठिकाण --- पडलेला पाऊस
पेंडगाव --- ११२,
चौसाळा --- १११,
नाझरा --- ११०
माडग्याळ --- १०६,
इस्लामपूर --- १०५,
पाली ---- १०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT