Banana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : साताऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस

Stormy Rain In Satara : सातारा, खंडाळा, पाटण तालुक्यात रविवारी दुपारनंतर कमी जास्त प्रमाणात झालेल्‍या वादळी पाऊस झाला आहे.

Anil Jadhao 

Satara Rain News : सातारा, खंडाळा, पाटण तालुक्यात रविवारी दुपारनंतर कमी जास्त प्रमाणात झालेल्‍या वादळी पाऊस झाला आहे. ढेबेवाडी खोऱ्याला आज वादळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. नागरिकांची त्यामुळे तारांबळ झाली. शिवारात, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते.

साताऱ्यासह विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार रविवारी दुपारी शहर परिसरातील आकाश काळ्या ढगांनी व्‍यापून गेले. साडेतीननंतर वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने शहर परिसरात हजेरी लावली.

शहरासह परिसरात आणि तालुक्‍याच्‍या विविध भागास या पावसाने झोडपून काढले. दीड तासाहून अधिक काळ हा पाऊस शहर आणि परिसरात बरसत होता.

ढेबेवाडी विभागातील काही ठिकाणी घरांचेही वादळाने नुकसान झाले आहे. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. रविवारी लग्नमुहूर्त असल्याने पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ झाली. मंद्रुळकोळे येथील कृष्णात यादव यांच्या घराचे पत्रे वादळाने उडून नुकसान झाले.

पावसामुळे ओढेही खळखळून वाहिले. श्री क्षेत्र नाईकबा यात्रेनंतरच्या पाच पाकाळण्या गेल्या रविवारी संपल्या आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडल्याचे दिसून आले. या पावसामुळे खरीप पेरणीपूर्व मशागती सुलभ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT